Dainik Maval News : योग शिक्षकांचा महासंमेलन आळंदी येथे नुकतेच साजरे झाले. यामध्ये योगशिक्षकांच्या बौद्धिक क्षमतेमध्ये अधिक वाढ व्हावी यासाठी वेगवेगळ्या विषयांवरील व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले होते.
विख्यात योगाभ्यासी असे प्रिन्सिपल ऑफ योग कॉलेज कैवल्यधाम येथील डॉक्टर शरदचंद्र भालेकर, द लोणावळा इन्स्टिट्यूट चे संचालक डॉक्टर मन्मथ घरोटे, भारतीय संस्कृती दर्शन चे संचालक डॉक्टर सुश्रुत सरदेशमुख, तसेच प्रख्यात स्त्रीरोगतज्ञ व योगाभ्यासी डॉक्टर विश्वास येवले यांची दर्जेदार व्याख्यान झाले. तर अनेक योगी खेळ आणि योगी संगीत रजनी सारख्या करमणुकीच्या कार्यक्रमातून सर्वांचे मन प्रसन्न झाले.
आपला महाराष्ट्र योग शिक्षक संघ योग शिक्षकांसाठी काय कार्य करत आहे योग विषयाला योग्य न्याय कसा मिळावा यासाठी आपले संस्थापक अध्यक्ष मनोज निलपवार यांनी मार्गदर्शन केले. हा योगशिक्षक संघ कोणी एकाचा नसून फक्त आणि फक्त योगशिक्षकांचा आहे यामध्ये कोणीही अधिकारी किंवा पद धारण करणारा असा नसून प्रत्येक जण योग्य शिक्षक आहे आणि प्रत्येकाला आपले मत आपले विचार मांडण्याचा अधिकार आहे, असे देखील सांगण्यात आले.
संमेलनाचे प्रमुख पाहुणे डॉ.श्री.शरदचंद्र भालेकर यांनी योगशिक्षक एकत्र येणे का गरजेचे आहे, हे सांगितले. तसेच डॉ मन्मथ घरोटे सर यांनी समाज स्वास्थ्य घडविणारा हा योगशिक्षक एकत्र आलाच पाहिजे तर डॉ.राजेंद्र खेडेकर यांनी आश्वासन दिले की योगशीक्षकांच्या 12 मागण्या सरकारपुढे ठेवल्या आहेत. त्या पूर्ण होण्यासाठी मी स्वतः प्रयत्न करेल. तसेच ओमानंद स्वामी आणि गेठेमहाराज यांनी आशीर्वाद दिले. संस्थेचे स्मरणिका प्रकाशन व कुणाल महाजन लिखित योग गीता या पुस्तकाचे प्रकाशन माननीय पाहुण्यांच्या हस्ते झाले.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मावळात सर्वदूर थंडीची लाट… ग्रामीण भागात सर्वाधिक गारठा । Maval News
– कालभैरवनाथ जयंतीनिमित्त वडगाव मावळ येथील श्री पोटोबा महाराजांचा जन्मोत्सव सोहळा संपन्न । Vadgaon Maval
– खळबळजनक ! वेटरला मारहाण केल्याने हॉटेल मालकाकडून स्वतःच्या मित्राचा खून, मावळमधील धक्कादायक घटना । Maval Crime