व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, June 18, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मावळ पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापती पदाची सोमवारी होणार निवड ; ‘या’ दोन नावांवर शिक्कामोर्तब

पुणे जिल्ह्यात मावळसह आठ ते नऊ तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे सभापती व उपसभापती होणार असल्याची माहिती पक्षाचे जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव शिंदे यांनी दिली.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
March 7, 2026
in मावळकट्टा, ग्रामीण, लोकल, शहर
Panchayat-Samiti-Maval

File Image


Dainik Maval News : मागील महिन्यात निकाल लागलेल्या मावळ पंचायत समितीच्या सर्व नवनिर्वाचित पंचायत समिती सदस्यांची विशेष बैठक सोमवारी (दि. ९) आयोजित करण्यात आली आहे. दरम्यान मावळ पंचायत समितीच्या दहाही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जिंकल्या असल्याने प्रदीर्घ कालावधीनंतर ही दोन्ही पदे राष्ट्रवादी काँग्रेसकडे जाणार आहेत.

Novel NIBR Ads

पक्षाने यापूर्वीच सभापती पदासाठी सुनीता येवले आणि उपसभापतीदासाठी साहेबराब कारके यांची नावे निश्चित केली आहेत. त्यामुळे सोमवारी होणाऱ्या बैठकीत या दोन्ही पदाधिकाऱ्यांची अधिकृत निवडीची औपचारिक बैठक पार पडेल.

महिनाभरापूर्वी झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या पाच आणि पंचायत समितीच्या दहा अशा सर्व पंधरा जागांवर विजय मिळवून निर्विवाद वर्चस्व मिळवले होते. सुमारे तीस वर्षांच्या कालावधीनंतर मावळ पंचायत समितीवर राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकविण्यात यश आले. तर भाजपाची सत्ता एका दमात राष्ट्रवादीने मोडून काढली.

सभापती व उपसभापती पदासाठी निवडणूक निर्णय अधिकारी सुरेंद्र नवले यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवारी (दि.९) निवडणूक होईल. यावेळी सभापती पद नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलेसाठी राखीव आहे. या प्रवर्गातून चांदखेड गणातून विजयी झालेल्या सुनीता येवले या सदस्या आहेत. पक्षानेही त्यांच्या नावावर यापूर्वी शिक्कामोर्तब केलेले आहे.

उपसभापती पदासाठी सोमाटणे गणातून विजयी झालेले साहेबराव कारके यांचे नाव आमदार सुनील शेळके यांनी निश्चित केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वच्या सर्व दहा सदस्य असल्याने या दोघांची बिनविरोध निवड होणार, हे जवळपास निश्चित आहे.

Novel NIBR Ads

निवडणूक कार्यक्रम पुढील प्रमाणे :
सकाळी १०.३० ते ११ – सभापती व उपसभापती पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करणे.
दुपारी १२.३० पासून विशेष सभेचे कामकाज सुरू करणे.

पुणे जिल्ह्यात मावळसह आठ ते नऊ तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे सभापती व उपसभापती होणार असल्याची माहिती पक्षाचे जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव शिंदे यांनी दिली.

( दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– इयत्ता चौथी आणि सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेकरिता नोंदणी आणि आवेदनपत्र भरण्यासाठी मुदतवाढ ; ‘या’ तारखेपर्यंत भरता येणार अर्ज
– मावळ कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संभाजी शिंदे यांचा राजीनामा ! जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे सोपविला राजीनामा
– वाहतूकीचे नियम मोडणारे, गाडीला काळ्या काचा – फॅन्सी नंबरप्लेट असलेल्या वाहन चालकांवर वडगाव मावळ पोलिसांची कारवाई
– पुणे – लोणावळा रेल्वे प्रवास होणार सुसाट.. प्रवाशांचा वेळ वाचणार ; रेल्वे विभागाचा मास्टर प्लॅन – वाचा सविस्तर


dainik maval jahirat

Previous Post

जिल्हा नियोजन समितीच्या (डीपीसी) निधीतून स्मशानभूमींच्या सुविधा उभारण्यात येणार

Next Post

Talegaon Dabhade : तळेगाव दाभाडे नगरपरिषदेकडून शहरात प्लॅस्टिक बंदी मोहिमेची अंमलबजावणी

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Talegaon Dabhade Municipal Council implements plastic ban campaign in the city

Talegaon Dabhade : तळेगाव दाभाडे नगरपरिषदेकडून शहरात प्लॅस्टिक बंदी मोहिमेची अंमलबजावणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Two habitual offenders arrested in connection with temple thefts in Talegaon Dabhade and Induri

तळेगाव दाभाडे आणि इंदुरी येथील मंदिरांमधील चोरी प्रकरणी दोन सराईत गुन्हेगार अटकेत

June 17, 2026
Lonavla-City-Police-Station

लोणावळा शहरात पर्यटकांचा मध्यरात्री ‘धांगडधिंगा’ ; पोलिसांचा अचानक छापा अन् १८ जणांवर गुन्हा

June 16, 2026
Strong opposition in Lonavala over mandatory installation of smart meters aggressive protests by BJP MNS NCP

Lonavala : लोणावळ्यात स्मार्ट मीटर सक्तीला तीव्र विरोध ; भाजपा, मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून आक्रमक आंदोलन

June 16, 2026
Monsoon session of marashtra State Legislature to be held in Mumbai from June 22 to July 10

राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन २२ जून ते १० जुलै २०२६ दरम्यान मुंबईत

June 16, 2026
organization has decided to close Shri Kshetra Bhimashankar temple for three months

भीमाशंकर मंदिर दर्शनासाठी सुरु ; दर्शनाकरिता पास अनिवार्य – जिल्हा प्रशासनाची माहिती

June 16, 2026
DCM Sunetra Pawar attends Shala Praveshotsav at PM SHRI Adarsha Kendra Zilla Parishad Primary School Kanhe Maval

मावळातील पीएम श्री आदर्श केंद्र जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कान्हे येथील ‘शाळा प्रवेशोत्सव’ कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची उपस्थिती

June 16, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.