Dainik Maval News : आमदार सुनिल शेळके यांची पुन्हा एकदा मावळच्या आमदारपदी विक्रमी मतांनी निवड झाल्यानंतर त्यांना मंत्रिपद मिळावे यासाठी नाणोली गावातील आमदार सुनिलआण्णा शेळके युवा मंच च्या वतीने ग्रामदैवत श्री फिरंगाई देवीला माता – भगिनींच्या हस्ते महाअभिषेक घालून महापुजा करण्यात आली.
उंच कड्यावरील कातळ शिल्पात कोरलेल्या मंदिरात ग्रामदैवत श्री फिरंगाई मातेचे देवस्थान असून पंचक्रोशीतील भाविकांचे मुख्य श्रध्दास्थान आहे. ३ किमी. चा डोंगर चढून देवीला साकडं घालण्यासाठी बहुसंख्येने माता – भगिनी व कार्यकर्ते उपस्थित होते. आमदार सुनिलआण्णा शेळके युवा मंच च्या वतीने भाविकांसाठी फराळाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी मावळ ता.ख.वि.संघाचे संचालक मा.सरपंच निलेश संभाजी मराठे, मा.उपसरपंच काळुराम मराठे, ग्रा.प.सदस्य विवेक शिंदे, ग्रा.प.सदस्य निलेश दत्तू मराठे, युवा नेते अंकुश शिंदे, संकेत जगताप, शंकर कोंडे, अनिकेत जगताप, प्रितेश आल्हाट, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष नाथा लोंढे, मोहन मराठे, दत्ता मांजरे, आकाश महाराज लोंढे, गणेश आल्हाट, प्रतिक जगताप, अक्षय लोंढे, अमोल दरवडे, सोमनाथ मराठे, प्रणय आल्हाट, सार्थक मराठे, अभि शिंदे, ओंकार भोसले, ऋतिक जगताप, श्रेयस आल्हाट आदि कार्यकर्ते व मोठ्या संख्येने माता-भगिनी उपस्थित होत्या.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत यासाठी मावळ तालुक्यातील तरुणांचे अनोखे साहस । Ajit Pawar & Sunil Shelke
– ‘सुनिलआण्णांच्या रुपाने मावळ तालुक्याला मंत्रिपद मिळावे’, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे यांची प्रदेशाध्यक्षांकडे मागणी
– कोणतेही खाते दिले तरीही मी जनतेला न्याय मिळवून देईन – आमदार सुनिल शेळके । MLA Sunil Shelke