Dainik Maval News : कार्लागडावर एकविरा देवीच्या दर्शनासाठी आलेले कोकण विभागाचे शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांना मावळ तालुक्यातील शिक्षकांनी विविध प्रलंबित समस्यांबाबत निवेदन दिले. शिक्षक मान्यता, शिक्षकांना ऑनलाइनची अतिरिक्त कामे, विद्यार्थ्यांचे आपार आयडी काढणे तसेच शाळा अनुदान व शिक्षक भरती संदर्भातील अनेक प्रश्न शिक्षकांनी आमदारांसमोर मांडले.
आमदार म्हात्रे यांनीही शिक्षकांचे सर्व म्हणणे आणि मागण्या ऐकूण घेत सर्व प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. तसेच राज्यातील टप्प्यावर असलेल्या अंशतः अनुदानित शाळांना लवकर शंभर टक्के अनुदान लागू व्हावे यासाठी देवीपुढे गाऱ्हाणे मांडल्याचे आमदार म्हात्रे यांनी सांगितले.
यावेळी मुख्याध्यापक संघाचे जिल्हा उपाध्यक्ष राजेश गायकवाड, मावळ तालुका अध्यक्ष विठ्ठल माळशिकारे, कार्याध्यक्ष रमेश अरगडे, सचिव विकास तारे, रमेश फरताडे, स्वप्निल नागणे, नारायण पवार यांसह मुख्याध्यापक, शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– पवनानगर येथील व्याख्यानात वसंत हंकारे यांच्याकडून ‘बाप समजावून घेताना’ हजारो विद्यार्थ्यांना भावना अनावर । Pavananagar
– पवना धरणात 2 युवक बुडाल्याचे प्रकरण : बंगला मालकासह नाव मालकाविरुद्ध गुन्हा दाखल । Pavana Dam News
– मावळ तालुक्यात शैक्षणिक गुणवत्ता संवर्धन अभियान राबविले जाणार । Maval News