Dainik Maval News : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर शनिवारी (दि.७) सायंकाळी पाचच्या सुमारास किलोमीटर ३४.७०० वरील मुंबई लेनवर असणाऱ्या फुडकोर्ट हॉटेल येथे भीषण अपघात झाला. ट्रेलर (क्रमांक एमएच ४६ बीएम ०३४३) वरील चालक बिपीन यादव (रा. सहागण जि. जोनपूर उत्तरप्रदेश) याचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने सदर ट्रेलर फुडकोर्ट हॉटेलच्या पहिल्या गेटवर आदळला.
यावेळी हॉटेलात कामास असलेला कामगार इंद्रदेव पासवान (वय १९ वर्ष, रा. सारसा बिहार) याचा ट्रेलरखाली आल्याने गंभीर जखमी होऊन मृत्यू पावला. तसेच फुडकोर्ट येथील पार्किंगमध्ये लावण्यात आलेल्या तीन कारला ट्रेलरची धडक बसल्याने संबंधित वाहनांचेही मोठे नुकसान झाले.
महामार्ग वाहतूक पोलीस यंत्रणा बोरघाट, खोपोली पोलीस स्टेशनची यंत्रणा, आयआरबी पेट्रोलिंग, देवदूत यंत्रणा, डेल्टा फोर्स, महाराष्ट्र सुरक्षा बलचे जवान, लोकमान्य हॉस्पिटलची ॲम्बुलन्स, स्वामिनी ॲम्बुलन्स, अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेचे सदस्य हे तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि मदतकार्य केले. अपघातातील मृत व्यक्तीला खोपोली नगरपालिका रुग्णालयात पाठविण्यात आले. तसेच अपघातातील बाधित वाहने सुरक्षित ठिकाणी बाजूला काढून वाहतूक सुरळीत केली.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– देवाभाऊ 3.0 : “मी देवेंद्र सरीता गंगाधरराव फडणवीस, ईश्वरसाक्ष शपथ घेतो की…” राज्यात नव्या ‘देवेंद्र’पर्वाचा आरंभ । Maharashtra New CM
– मुख्यमंत्री बनताच देवेंद्र फडणवीस यांची पहिली स्वाक्षरी वैद्यकीय मदतीच्या फाईलवर, पुण्याच्या रुग्णाला पाच लाखांची मदत
– “मी अजित आशाताई अनंतराव पवार, गांभीर्यपूर्वक शपथ घेतो की… अजित पवार यांनी विक्रमी सहाव्यांदा घेतली उपमुख्यमंत्रिपदाची शपथ