Dainik Maval News : वडगाव मावळ येथे एका कंपनीत अडचणीच्या ठिकाणी अडकलेल्या सांबर हरणाची वनविभाग वडगाव आणि वन्यजीव रक्षक मावळ संस्था यांच्याकडून सुखरुप सुटका करण्यात आली.
आशिष कंपनी वडगाव फाटा इथे एक सांबर कंपनीच्या आवारात अडकल्याची माहिती अनिकेत काळोखे यांनी वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे निलेश गराडे यांना दिली. त्यानंतर निलेश गराडे, जिगर सोलंकी, सार्जेश पाटील, रोहित पवार, गणेश ढोरे, निनाद काकडे, अनिश गराडे हे कंपनीत पोहोचले. थोड्याच वेळात वडगाव वनविभाग वनरक्षक पी. कासोले, य. कोकाटे, एस, मोरे व इतर सदस्य आले.
कंपनीत एक नर सांबर अडचणीच्या ठिकाणी एका दोरीत अडकले होते. सर्व सदस्यांनी अथक परीश्रम केल्यानंतर सांबराला सुखरुप बाहेर काढले. त्याची प्राथमिक तपासणी केली असता जखमी नसल्याने लगेच वनपरिक्षेत्रात मुक्त करण्यात आले. यावेळी भीम सिंह सोनार, प्रेम सिंह सोनार व कंपनीचे कर्मचारी यांचीही मदत झाली.
कोणता ही वन्यप्राणी जखमी अवस्थेत आढळून आल्यास जवळ पास च्या प्राणीमित्र ला किंवा वनविभागला संपर्क (१९२६) करावा असे आव्हान वन्यजीव रक्षक मावळ संस्था व वनविभाग यांच्याकडून करण्यात आले आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मावळ तालुक्यातील ‘या’ महत्वाच्या चौकांमध्ये उड्डाणपूल उभारणे गरजेचे ; आमदार सुनिल शेळके यांची अधिवेशनात मागणी
– मोठी बातमी : पुणे-लोणावळा लोहमार्गावरील तिसऱ्या आणि चौथ्या ट्रॅकला मिळणार गती । Pune – Lonavala Local
– मावळातील शेतकऱ्यांची भात भरडण्यासाठी लगबग ; इंद्रायणी तांदुळाला सर्वोत्तम दराची अपेक्षा । Maval News