व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Friday, June 12, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मावळातील ऐतिहासिक स्थळांच्या संवर्धनासाठी निधी द्या – खासदार श्रीरंग बारणे यांची मागणी

खासदार श्रीरंग बारणे यांची केंद्रीय सांस्कृतिक व पर्यटन मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांच्याकडे मागणी

Team Dainik Maval by Team Dainik Maval
December 21, 2024
in पुणे, ग्रामीण, ग्रामीण, मावळकट्टा, लोकल, शहर
MP Shrirang Barne demand for funds for Maval from Minister Gajendrasinh Shekhawat

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : मावळ लोकसभा मतदारसंघात किल्ले लोहगड, तिकोना, राजमाची, विसापूर आणि ४०० वर्षे पुरातन घोडेश्वर लेणी आहे. या ऐतिहासिक स्थळांचे संवर्धन करणे आवश्यक आहे. विशेष देखरेख व संवर्धनासाठी निधी उपलब्ध करून द्यावा. तसेच घारापुरी लेणीतील शिवमंदिर सोमवारी नागरिकांसाठी खुले ठेवण्यात यावे. घोरावडेश्वर डोंगर येथे रोप-वे मार्ग निर्माण करण्याची मागणी मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी केंद्र सरकारकडे केली आहे.

Novel NIBR Ads

खासदार बारणे यांनी केंद्रीय सांस्कृतिक व पर्यटन मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांची भेट घेऊन किल्ल्यांचे संवर्धन करण्यासाठी निधी देण्याची मागणी केली. त्यावर लवकरात लवकर निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही शेखावत यांनी दिली.

खासदार बारणे म्हणाले, पुणे जिल्हा हा छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी आहे. मावळमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे प्राचीन गडकिल्ले आहेत. किल्ले लोहगड, तिकोना, राजमाची, विसापूर हे किल्ले आहेत. या किल्ल्यांना भेट देण्यासाठी, इतिहास जाणून घेण्यासाठी हजारो पर्यटक, अभ्यासक येत असतात. किल्ल्यावर जाणाऱ्या पायऱ्या मोडकळीस आल्या आहेत. त्याची डागडुजी करणे आवश्यक आहे. किल्ल्यांचे संवर्धन करणे गरजेचे आहे. त्यासाठी निधी देण्याची मागणी केली आहे. मंत्री शेखावत यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे या ऐतिहासिक स्थळांच्या संवर्धनासाठी लवकरच ठोस पावले उचलली जातील, असा विश्वास आहे.

घोरावडेश्वर डोंगर येथे रोप-वे करा
देहूरोड येथे घोरावडेश्वर डोंगर आहे. या डोंगरावर पुरातन शिव मंदिर आहे. मंदिराला भेट देणाऱ्या भाविकांची मोठी गर्दी असते. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांनीही येथे वास्तव्य केले आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी देखील या मंदिराला भेट दिली होती. दरवर्षी शिवरात्रीला आजूबाजूच्या जिल्ह्यातील लाखो भाविक येथे दर्शनासाठी येतात. भाविकांसाठी डोंगरावर जाण्याकरिता पायऱ्यांच्या मार्गाची पुनर्रचना करावी. पायऱ्यांच्या मार्गावर पथदिवे बसविणे आवश्यक आहे.

मंदिर डोंगरावर असल्याने रोप-वे मार्गाची निर्मिती करावी. या ऐतिहासिक वास्तूच्या देखभालीची आणि जतनाची काळजी घेण्यासाठी देखभाल कर्मचाऱ्यांची नियुक्ती, सार्वजनिक शौचालयांची व्यवस्था करावी अशी मागणीही खासदार बारणे यांनी केली. या ऐतिहासिक स्थळाच्या विकासासाठी आणि संवर्धनासाठी आवश्यक उपाययोजना करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना तत्काळ निर्देश देण्याची ग्वाही मंत्री शेखावत यांनी दिली.

Novel NIBR Ads

घारापुरी लेणीतील शिवमंदिर सोमवारी नागरिकांसाठी खुले ठेवा –
श्रावणमासातील प्रत्येक सोमवारी देशभरातील विविध शिवमंदिरांत शिवदर्शनासाठी भाविकांची गर्दी उसळत असते. मात्र मावळ मतदारसंघातील घारापुरी बेटावरील महादेवाची विविध रूपे असलेली अतिप्राचीन लेणी सोमवारीच बंद ठेवली जात आहे. यामुळे दररोज बेटावर येणाऱ्या हजारो देशी-विदेशी पर्यटक भाविकांना शिवदर्शनाला मुकावे लागत आहे.

घारापुरी बेटावर कलचुरी घराण्याच्या कारकिर्दीत कोरण्यात आलेली अतिप्राचीन कोरीव लेणी आहेत. काळ्या पाषाणात योगेश्वर शिव, रावणानुग्रहमूर्ती, शिवपार्वती, अर्धनारीनटेश्वर, गंगावतरण शिव, शिवपार्वती विवाह, अंधकारसुरवधमूर्ती, नटराज शिव आणि महेशमूर्ती अशी शिवाची विविध रूपे या कोरीव शिल्पात अद्भुतरीत्या कोरलेली आहेत. मात्र, वर्ल्ड हेरिटेजचा दर्जा लाभलेल्या घारापुरी लेणी पुरातत्त्व विभागाकडून दुरुस्ती, देखभालीसाठी आठवड्याच्या प्रत्येक सोमवारी बंद ठेवली जाते. श्रावण महिन्यातील सोमवारीही बंद ठेवण्यात येत आहे. यामुळे किमान श्रावणातल्या सोमवारी तरी शिवदर्शनासाठी पुरातत्त्व विभागाने लेणींचे प्रवेशद्वार पर्यटक शिवभक्तांसाठी खुले करावे, अशी मागणीही खासदार बारणे यांनी केली आहे.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मावळ तालुक्यातील ‘या’ महत्वाच्या चौकांमध्ये उड्डाणपूल उभारणे गरजेचे ; आमदार सुनिल शेळके यांची अधिवेशनात मागणी
– मोठी बातमी : पुणे-लोणावळा लोहमार्गावरील तिसऱ्या आणि चौथ्या ट्रॅकला मिळणार गती । Pune – Lonavala Local
– मावळातील शेतकऱ्यांची भात भरडण्यासाठी लगबग ; इंद्रायणी तांदुळाला सर्वोत्तम दराची अपेक्षा । Maval News 


dainik maval jahirat

Previous Post

वडगाव येथे खासगी कंपनीत अडकलेल्या सांबर हरणाला जीवदान । Vadgaon Maval

Next Post

कला-क्रीडा महोत्सवात मावळातील अतिदुर्गम भागातील खांडी शाळेचे घवघवीत यश । Maval News

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
huge success of Khandi School ​​Maval in arts and sports festival

कला-क्रीडा महोत्सवात मावळातील अतिदुर्गम भागातील खांडी शाळेचे घवघवीत यश । Maval News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Liquor stock and contraband worth over 1 crore seized on Mumbai-Pune Highway one person arrested

मुंबई-पुणे महामार्गावर सुमारे १ कोटीहून अधिकचा मद्यसाठा व मुद्देमाल जप्त, एकाला अटक ; राज्य उत्पादन शुल्कची कारवाई

June 12, 2026
pune police

महत्वाची बातमी! पुणे ग्रामीण जिल्ह्यात १३ ते २६ जूनपर्यंत जमावबंदी आदेश

June 12, 2026
Protest against attack on tax inspector Employees protest in Talegaon Dabhade Municipal Council

Talegaon Dabhade : कर निरीक्षकावरील हल्ल्याचा निषेध ; तळेगाव दाभाडे नगरपरिषदेत कर्मचाऱ्यांकडून आंदोलन

June 12, 2026
Decisive momentum for rehabilitation of Pawana Dam victims Maval which pending for decades

पवना धरणग्रस्तांना प्रत्येकी २ एकर जागा देण्याबाबत शासन सकारात्मक; पुनर्वसनासाठी आवश्यक जागा उपलब्ध करून देण्याचा निर्णय

June 12, 2026
Farmers face digital struggle to purchase fertilizer new app system proving to be headache

खत खरेदीसाठी शेतकऱ्यांची ‘डिजिटल’ कसरत ; नवीन ॲप प्रणाली ठरतेय डोकेदुखी

June 11, 2026
Land to be provided for Patrakar Bhavan Press Club in all districts said Minister Chandrashekhar Bawankule

सर्व जिल्ह्यांत पत्रकार भवनासाठी जागा देणार; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची मोठी घोषणा

June 11, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.