Dainik Maval News : महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळ, जिल्हा कार्यालय पुणे, समाजकल्याण विभाग विश्रांतवाडी जिल्हा पुणे येथे जागतिक दिव्यांग दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी ई-व्हेईकल व्यवसाय मार्गदर्शन व दिव्यांग जागृती सप्ताह साजरा करण्यात आला.
यावेळी उपस्थित लाभार्थ्यांना जिल्हा व्यवस्थापक माने, सहाय्यक शिंदे यांनी शुभेच्छा देऊन सत्कार केला. वसुली निरीक्षक शितल सिद्राल व वसुली निरीक्षक सविता मोरे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी कार्यक्रमानिमित्त उपस्थितीमध्ये सारिका ढमाले (राष्ट्रवादी काँग्रेस दिव्यांग सेल पुणे, जिल्हा महिला सरचिटणीस) व बाजीराव ढमाले (सामाजिक कार्यकर्ते) यावेळी उपस्थित होते.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मावळ तालुक्यातील ‘या’ महत्वाच्या चौकांमध्ये उड्डाणपूल उभारणे गरजेचे ; आमदार सुनिल शेळके यांची अधिवेशनात मागणी
– मोठी बातमी : पुणे-लोणावळा लोहमार्गावरील तिसऱ्या आणि चौथ्या ट्रॅकला मिळणार गती । Pune – Lonavala Local
– मावळातील शेतकऱ्यांची भात भरडण्यासाठी लगबग ; इंद्रायणी तांदुळाला सर्वोत्तम दराची अपेक्षा । Maval News