अपघातांची मालिका कधीही खंडित न होणाऱ्या मुंबई-बंगळुरु महामार्गावर प्रशासनाने काही ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून सातत्याने केली जाते. अशावेळी वेगावर नियंत्रण आणण्यासाठी स्पीड गन लावून तसेच सीसीटीव्ही कॅमेरे बसवून बेशिस्त वाहन चालक अथवा नियम मोडणाऱ्या वाहन चालकांवर कारवाई करण्याचा प्रथमोपचार प्रशासनाकडून नेहमीच केला जातो. त्यातूनच मुंबई-बंगळुरू महामार्गावर मागील 6 महिन्यांत तब्बल 40 कोटींचा दंड वसून करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. ( 40 Crore Fine In 6 Months on Mumbai Bangalore Highway Read in Details )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
वाहतूक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मागील सहा महिन्यांत 40 कोटींचा दंड वसूल करण्यात आला आहे. महत्वाची बाब म्हणजे काही दिवसांपूर्वीच महामार्गावरील पुणे शहराजवळील नवले पुलावर झालेल्या अपघाताच्या ठिकाणी या काळात सर्वाधिक दंड वसूल करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोप आली आहे.
मुंबई – बेंगलोर महामार्गावर कात्रज ते नवले पुलापर्यंत वाहतूक चालकांकडून मोठ्या प्रमाणात नियमांचे उल्लंघन होत असल्याचे दिसून आले आहे. नवले पुलाजवळ उतारावर लावलेल्या कॅमेरातून तब्बल 1 लाख 95 हजार वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे. असे असतानाही चालकांकडून या भागात वेग कमी होताना दिसत नाही. 60 किमीप्रतितास अशी वेगमर्यादा असताना त्याचेही उल्लंघन होताना दिसत आहे. त्यामुळे होणाऱ्या अपघातांना वाहन चालक देखील तितकेच जबाबदार आहेत.
अधिक वाचा –
– Video : सहाय्यक पोलिस निरीक्षक सुभाष पुजारी यांना मानाचा ‘चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स’ किताब, ऑल इंडिया पोलीस गेम्समध्ये सुवर्णपदक
– कुटुंबातील कुणी कर्जदार व्यक्ती कोरोनाने गेला असल्यास ही बातमी नक्की वाचा, सहकार विभागाचा दिलासादायक निर्णय