Dainik Maval News : पवन मावळ विभागातील ग्रुप ग्रामपंचायत शिळींबच्या उपसरपंचपदी स्वाती मंगेश ढमाले यांची निवड करण्यात आली आहे. ग्रामपंचायतीचे मावळते उपसरपंच विजय धनवे यांनी पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या उपसरपंच पदासाठी सरपंच सिद्धांत उर्फ सनी कडू यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी (दि.७) विशेष सभा बोलाविण्यात आली होती.
यावेळी विहित मुदतेत उपसरपंच पदासाठी स्वाती ढमाले यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. ग्रामसेवक दिपक शिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. निवडीनंतर ग्रामपंचायतीचे सरपंच, सदस्य आणि ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत नवनिर्वाचित उपसरपंच यांचा विशेष सत्कार करण्यात आला. तसेच गुलालाची उधळण करीत आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मोठा निर्णय : राज्यात सर्व चारचाकी वाहन धारकांना एक एप्रिलपासून फास्ट टॅग अनिवार्य
– महाराष्ट्र शासनाच्या कामकाजातील निर्णय प्रक्रीया सुलभ व गतीमान होणार ; प्रशासकीय कारभार बनणार अधिक पारदर्शक
– नवं सरकार, नवं धोरण : ‘ईज ऑफ लिव्हिंग’साठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सात कलमी कृती कार्यक्रम