Dainik Maval News : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांचे पाच दिवसांच्या वास्तव्यासाठी आंदर मावळ मधील वहानगाव येथील आयुर्वेदिक केंद्र परिसरात सोमवारी आगमन झाले.
डॉ. भागवत यांचा हा दौरा खाजगी स्वरूपाचा असल्याचे सांगण्यात येत आहे. निसर्गाची मुक्त हस्ते उधळण असलेला देखणा परिसर म्हणून आंदर मावळ मधील वहानगाव, कुसवली या गावांची ओळख आहे.
सुमारे 50 एकर विस्तीर्ण जागेमध्ये असलेल्या केंद्रात आयुर्वेदिक वनस्पती, फुलझाडे, नैसर्गिक वनसंपदेचे रक्षण, संवर्धन व लागवडीचे काम या ठिकाणी केले जाते. प्रसिद्ध चित्रपट निर्माता दिग्दर्शक विधू विनोद चोप्रा यांचे निवासस्थान तसेच अनाथ निराधारांसाठी असलेले प्रसिद्ध सहारा वृद्धाश्रम देखील याच भागात आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मोठा निर्णय : राज्यात सर्व चारचाकी वाहन धारकांना एक एप्रिलपासून फास्ट टॅग अनिवार्य
– महाराष्ट्र शासनाच्या कामकाजातील निर्णय प्रक्रीया सुलभ व गतीमान होणार ; प्रशासकीय कारभार बनणार अधिक पारदर्शक
– नवं सरकार, नवं धोरण : ‘ईज ऑफ लिव्हिंग’साठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सात कलमी कृती कार्यक्रम