व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, April 26, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

पाणी पुरवठा योजनांची कामे ठरविलेल्या मुदतेत पूर्ण न करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई होणार

कामात दिरंगाई करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करावी – पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील

Team Dainik Maval by Team Dainik Maval
January 9, 2025
in महाराष्ट्र
Water Supply Scheme Jal Jeevan Mission

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाच्या योजनांतर्गत मंजूर विविध कामांची विहीत कालमर्यादेत पूर्तता न करणाऱ्या कंत्राटद्वारांवर नियमानुसार कारवाई करण्याचे निर्देश पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी संबंधितांना दिले.

मंत्रालयात आयोजित ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील पाणी पुरवठा व स्वच्छता विभागांतर्गत कामांच्या आढावा बैठकीत मंत्री पाटील यांनी संबंधितांना सूचना दिल्या. बैठकीस विभागाचे सचिव संजय खंदारे, जल जीवन मिशन अभियानाचे संचालक ई. रविंद्रन यांच्यासह संबंधित यंत्रणांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

मंत्री गुलाबराव पाटील यांनी जल जीवन मिशन, स्वच्छ भारत मिशन अंतर्गत कामांची प्रभावी अंमलबजावणी करण्यावर प्रामुख्याने भर द्यावा, असे सूचित करून त्यांनी विभागाच्या परिपत्रकाप्रमाणे कामात दिरंगाई करणाऱ्यावर दंडात्मक कारवाई करण्याचे सूचित केले.

त्याचप्रमाणे कामांची वेळोवेळी पाहणी करुन त्याबाबतचा अद्यावत क्षेत्रीय पाहणी आणि आर्थिक प्रगती अहवाल ठेवावा. कामांची पाहणी करून त्यानतंरच प्रमाणिकरण द्यावे. तसेच पूर्ण झालेल्या योजना हस्तांतरित करुन योजना अंमलबजावणीच्या कामांची टप्पे निहाय जबाबदारी निश्चित करण्यात यावी. योजनांची अमंलबजावणी दर्जेदाररित्या वेळेत पूर्ण होण्याच्या दृष्टीने यंत्रणा प्रमुखांनी त्यांच्यास्तरावर कटाक्षाने लक्ष देऊन तालुका निहाय आढावा घ्यावा,असे सूचित केले.

बैठकीत जल जीवन मिशन अंतर्गत कार्यान्वीत घरगुती नळ जोडणी सद्यस्थिती, हर घर जल प्रमाणीकरण, आर्थिक खर्चाची सद्यस्थिती, योजना पूर्ण व हस्तांतरण सद्यस्थिती, प्रलंबित योजनांची माहिती, स्वच्छ भारत मिशन, (ग्रा.) 2.0 या योजनेच्या अंतर्गत विविध कामांचा सविस्तर आढावा यावेळी घेण्यात आला.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मोठा निर्णय : राज्यात सर्व चारचाकी वाहन धारकांना एक एप्रिलपासून फास्ट टॅग अनिवार्य
– महाराष्ट्र शासनाच्या कामकाजातील निर्णय प्रक्रीया सुलभ व गतीमान होणार ; प्रशासकीय कारभार बनणार अधिक पारदर्शक
– नवं सरकार, नवं धोरण : ‘ईज ऑफ लिव्हिंग’साठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सात कलमी कृती कार्यक्रम


Previous Post

महाराष्ट्रात राबविले जाणार ‘ई कॅबीनेट’ , गतीमान कारभारासाठी मुख्यमंत्र्यांचा महत्वाचा निर्णय, जाणून घ्या अधिक

Next Post

राज्यातील कोणत्याही कार्यालयातून करता येणार दस्त नोंदणी ; मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली ‘वन स्टेट वन रजिस्ट्रेशन’ योजना

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Deed registration can be done from any office in state CM Fadnvis announced One State One Registration scheme

राज्यातील कोणत्याही कार्यालयातून करता येणार दस्त नोंदणी ; मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली 'वन स्टेट वन रजिस्ट्रेशन' योजना

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Work to remove silt from Pawana Dam begins Initiative under MP Shrirang Barne Maval

पवना धरणातून गाळ काढण्याचे काम सुरू ; खासदार श्रीरंग बारणे यांच्या पुढाकारातून सलग १० वर्षांपासून उपक्रम सुरू

April 26, 2026
Maval Taluka Agricultural Produce Market Committee dissolved due to lack of quorum

मावळ कृषी उत्पन्न बाजार समिती बरखास्त प्रकरण कोर्टातून मंत्रालयात ! पणन मंत्री भाजपाचे असल्याने निकालाकडे तालुक्याचे लक्ष

April 26, 2026
Planning to avoid incidents like traffic jams on Mumbai-Pune Expressway said Minister Dadaji Bhuse

मुंबई-पुणे प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज ! दिनांक 1 मे रोजी महाराष्ट्र दिनी नव्या ‘मिसिंग लिंक’चे होणार लोकार्पण

April 26, 2026
young man from Buldhana died while swimming in Pawana river near Bebadohal Maval

बेबडओहळ जवळ पवना नदीत पोहताना प्रवाहाचा अंदाज न आल्याने बुलढाणा येथील तरूणाचा मृत्यू

April 25, 2026
Bhumi Pujan of various road development works in Keshavnagar area of ​​Vadgaon Nagar Panchayat Maval

वडगाव नगरपंचायतमधील केशवनगर परिसरातील विविध रस्ते विकासकामांचा भूमिपूजन समारंभ संपन्न । Vadgaon Maval

April 25, 2026
Maharashtra Legislature Vidhan Bhavan

बिगुल वाजले ! महाराष्ट्र विधानपरिषदेच्या १० जागांसाठी १२ मे रोजी मतदान व मतमोजणी

April 24, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.