Dainik Maval News : नियमित व वेळेवर कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये प्रोत्साहनपर मदत देण्याचे सरकारने जाहीर केले होते. परंतु सरकारने जाहीर केलेली ही मदत अद्याप काही शेतकरी सभासदांच्या खात्यात जमा झालेली नाही. ही रक्कम लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी अन्यथा भविष्यात शेतकऱ्यांसाठी आंदोलन करण्याचा इशारा भाजपा किसान मोर्चाने दिला आहे.
भाजपा किसान मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष सुभाष धामणकर, तालुकाध्यक्ष सूर्यकांत सोरटे, मच्छिंद्र केदारी, विकास शेलार, गोरख साठे, संतोष काळे, गुलाबराव घारे, शांताराम दरेकर, हरिभाऊ दळवी, संतोष येवले यांनी याबाबतच्या मागणीचे निवेदन नायब तहसीलदार यांच्याकडे सोपविले. तसेच निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार व आमदार सुनील शेळके आणि संबंधित अधिकाऱ्यांना पाठविल्या आहेत.
नियमित व वेळेवर कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना रूपये 50 हजार प्रोत्साहनपर मदत सरकारने देण्याचे जाहीर केले होते. पंरतु अद्यापही सरकारने जाहीर केलेली मदत शेतकरी सभासदांच्या बँक खात्यात जमा झालेली नाही. यामुळे शेतकरी वर्गामध्ये संताप व नाराजी आहे. शेतकऱ्यांनी वेळेवर कर्ज परतफेड करुन चूक केली का? सरकारने जर प्रोत्साहनपर अनुदान जमा केले नाही तर विविध कार्यकारी सोसायटीच्या कर्ज वसुलीच्या टक्केवारीवर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येणार नाही, असे निवेदनात महटले आहे.
तसेच, मावळ तालुक्यामध्ये पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अंतर्गत विविध कार्यकारी सोसायटीकडून नियमित व वेळेवर कर्ज परतफेड केलेल्या शेतकऱ्यांची संख्या ही जवळपास 7110 आहे. त्यापैकी 2865 शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर सरकारने 50 हजार रुपये मदत जमा केली आहे. पंरतु उर्वरित शेतकरी सभासदांना प्रोत्साहनपर मदत मिळणे बाकी आहे. ती मदत सरकारने शेतकरी सभासदांच्या बँक खात्यावर 30 मार्चच्या अगोदर जमा करावी. अन्यथा शेतकऱ्यांच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, इशारा देखील निवेदनात दिला आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– ई-हक्क प्रणाली : वारस नोंद, 7/12 वरील इकरार नोंदी, मयताचे नाव कमी करणे यासाठी आता घरबसल्या जमा करा कागदपत्रे
– नैसर्गिक आपत्तीग्रस्त ५.३० लाख शेतकऱ्यांना ५३५ कोटी रुपयांची पीक नुकसान भरपाई ; थेट खात्यात जमा होणार रक्कम
– HSC Exam Hall Ticket : बारावी बोर्ड परीक्षेचे प्रवेशपत्र (हॉलतिकीट) ऑनलाईन उपलब्ध, असे करा डाउनलोड