व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, April 26, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

लोणावळा शहरातील जुगार अड्ड्यांवर व दारू अड्ड्यावर पोलिसांची धडक कारवाई । Lonavala News

पोलिसांनी एकूण तीन मटका अड्ड्यांवर छापा टाकून 4 आरोपींना ताब्यात घेतले आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
January 12, 2025
in लोकल, शहर
Lonavla-City-Police-Station

Photo Courtesy : File Photo : Lonavla City Police Station


Dainik Maval News : लोणावळा शहर पोलिसांनी लोणावळा शहर हद्दीमध्ये बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या मटका अड्ड्यांवर धडाकेबाज कारवाई करीत सदरचे अड्डे बंद केले आहेत. पोलिसांनी एकूण तीन मटका अड्ड्यांवर छापा टाकून 4 आरोपींना ताब्यात घेतले आहे. तसेच सहा हजार चारशे दहा रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याशिवाय बेकायदेशीर दारू विक्री करणाऱ्या एका व्यक्तीवर कारवाई करीत त्याच्या ताब्यातील चौदाशे रुपयांच्या चाळीस मद्याच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत.

पोलीस निरीक्षक अरुण फुगे आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल लाड यांच्या मार्गदर्शनाखाली लोणावळा शहर पोलिसांनी केलेल्या कारवाई मध्ये किरण राजु जाधव (वय ३२ वर्षे,) विकास भिमाजी पैलवान (वय ३२, दोघे रा. गवळीवाडी लोणावळा), वैभव भगवान साठे (वय २५ वर्ष ,रा. ओळकाईवाडी, कुसगाव ता. मावळ जि.) आणि अशोक जगन्नाथ फाळके (रा.आण्णाभाऊ वसाहत सिद्धार्थनगर, लोणावळा) या चौघांना तीन वेगवेगळ्या अड्ड्यावर लोकांकडुन पैसे घेवुन कल्याण मटका नावाचा जुगार खेळताना ताब्यात घेतले. या सर्वांवर महाराष्ट्र जुगार बंदी अधिनियम कलम १२ (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुसऱ्या एका कारवाई मध्ये राजु प्रभाकर जाधव (वय ५० वर्षे, रा. गावठाण खंडाळा, लोणावळा) याला बेकायदा बिगर देशी दारू विक्री करीत असताना ताब्यात घेण्यात आले. त्याच्या विरोधात महाराष्ट्र दारु बंदी अधिनियम क 65 (ई) अन्वये कारवाई करण्यात आली आहे. या सर्व कारवाईमध्ये पोलीस हवालदार राहुल पवार, पोलीस कर्मचारी रमेश उगले आणि पवन कराड आदींनी सहभाग घेतला. पोलीस हवालदार मयूर अबनावे यांनी हे गुन्हे दाखल करून घेतले. पोलीस हवालदार शकील शेख, म्हेत्रे, व पोलीस नाईक शिंदे हे पुढील तपास करीत आहे.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– ई-हक्क प्रणाली : वारस नोंद, 7/12 वरील इकरार नोंदी, मयताचे नाव कमी करणे यासाठी आता घरबसल्या जमा करा कागदपत्रे
– नैसर्गिक आपत्तीग्रस्त ५.३० लाख शेतकऱ्यांना ५३५ कोटी रुपयांची पीक नुकसान भरपाई ; थेट खात्यात जमा होणार रक्कम
– HSC Exam Hall Ticket : बारावी बोर्ड परीक्षेचे प्रवेशपत्र (हॉलतिकीट) ऑनलाईन उपलब्ध, असे करा डाउनलोड


Previous Post

‘नियमित व वेळेवर कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान लवकर द्या, अन्यथा आंदोलन करणार’

Next Post

शासकीय इंटरमिडीयट चित्रकला स्‍पर्धेत एकविरा विद्या मंदिर शाळेचा शंभर टक्के निकाल । Karla News

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Hundred percent result of Ekvira Vidya Mandir School in Government Intermediate Painting Competition

शासकीय इंटरमिडीयट चित्रकला स्‍पर्धेत एकविरा विद्या मंदिर शाळेचा शंभर टक्के निकाल । Karla News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Work to remove silt from Pawana Dam begins Initiative under MP Shrirang Barne Maval

पवना धरणातून गाळ काढण्याचे काम सुरू ; खासदार श्रीरंग बारणे यांच्या पुढाकारातून सलग १० वर्षांपासून उपक्रम सुरू

April 26, 2026
Maval Taluka Agricultural Produce Market Committee dissolved due to lack of quorum

मावळ कृषी उत्पन्न बाजार समिती बरखास्त प्रकरण कोर्टातून मंत्रालयात ! पणन मंत्री भाजपाचे असल्याने निकालाकडे तालुक्याचे लक्ष

April 26, 2026
Planning to avoid incidents like traffic jams on Mumbai-Pune Expressway said Minister Dadaji Bhuse

मुंबई-पुणे प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज ! दिनांक 1 मे रोजी महाराष्ट्र दिनी नव्या ‘मिसिंग लिंक’चे होणार लोकार्पण

April 26, 2026
young man from Buldhana died while swimming in Pawana river near Bebadohal Maval

बेबडओहळ जवळ पवना नदीत पोहताना प्रवाहाचा अंदाज न आल्याने बुलढाणा येथील तरूणाचा मृत्यू

April 25, 2026
Bhumi Pujan of various road development works in Keshavnagar area of ​​Vadgaon Nagar Panchayat Maval

वडगाव नगरपंचायतमधील केशवनगर परिसरातील विविध रस्ते विकासकामांचा भूमिपूजन समारंभ संपन्न । Vadgaon Maval

April 25, 2026
Maharashtra Legislature Vidhan Bhavan

बिगुल वाजले ! महाराष्ट्र विधानपरिषदेच्या १० जागांसाठी १२ मे रोजी मतदान व मतमोजणी

April 24, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.