Dainik Maval News : पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या वतीने सुरू असलेल्या “संकल्प नशामुक्ती अभियान” अंतर्गत लोणावळा उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांनी कारवायांचा धडाका सुरु ठेवला आहे. आयपीएस सत्यसाई कार्तिक यांना शुक्रवारी (दि.31) गोपनीय माहिती मिळाली की, लोणावळा ग्रामीण पोलिस स्टेशन हद्दीतील वेहेरगाव येथील संतोष बोत्रे यांच्या पडीक जमिनीवरील झाडाखाली काहीजण कल्याण मटका नावाचा जुगार खेळत आहेत.
- मिळालेल्या माहितीच्या आधारे सत्यसाई कार्तिक यांनी लगेचच पोलीस पथक व पंचाना माहिती सांगून सदर ठिकाणी छापा टाकण्यास सांगितले. त्यानुसार पोलिसांनी केलेल्या कारवाईत, 1) गोरख रघूनाथ मोहीते (वय 65 वर्षे, रा. टाकवे खुर्द, ता. मावळ), 2) सुनिल आप्पा बंडगर (वय 30 वर्षे, रा.नऱ्हेगाव ता. हवेली) 3) धोंडू दत्तू बोरकर (वय 52 वर्षे, रा. वेहेरगाव, ता. मावळ) 4) विश्वनाथ संभाजी गायकवाड (वय 44 वर्षे, रा. टाकवे खुर्द, ता. मावळ) 5) गजानन किसन पारधी (वय 52 वर्षे, रा.भाजे, ता.मावळ) 6) सचिन गणेश तिकोणे (वय 41 वर्षे, रा.पाटण, ता.मावळ) 7) मधूकर केशव बगाडे (वय 72 वर्षे, रा.मळवली, कामशेत, ता. मावळ) 8) विलास भागुजी देशमुख (वय 42 वर्षे, रा. वेहेरगाव, ता.मावळ) 9) संदीप शांताराम कौदरे (वय 36 वर्षे, रा. वाकसई, ता. मावळ) 10) चंद्रकांत देवकर (रा. वेहरगांव, ता. मावळ) यांना कल्याण मटका नावाचा जुगार खेळताना ताब्यात घेण्यात आले.
त्यांच्याकडून रोख रक्कम, साहित्य, मोटार सायकल, पावती पुस्तके, मोबाईल फोन असा एकूण 1 लाख 64 हजार 700 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच त्यांच्यावर लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन ला मुंबई जुगार कायदा कलम १२(अ) अन्वये गुन्हे दाखल केला असून पुढील तपास लोणावळा ग्रामीण पोलीस करत आहेत.
सदरची कारवाई पुणे ग्रामीण पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली लोणावळा उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांनी त्यांचे पथकातील पोहवा नितेश (बंटी) कवडे, अंकुश नायकुडे, दत्ता शिंदे, अंकुश पवार यांनी केली आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– दुचाकी, चारचाकी वाहनांचे पक्के ड्रायव्हिंग लायसन्स पाहिजे? आरटीओकडून फेब्रुवारीचे वेळापत्रक जाहीर, पाहा आवश्यक कागदपत्रे
– पुणे जिल्हा नियोजन समितीची बैठक संपन्न ; 1 हजार 299 कोटींच्या प्रारूप आराखड्यास व 753 कोटींच्या अतिरिक्त मागणीस मान्यता
– तळेगाव शहर हादरले ! भरदिवसा गर्दीच्या ठिकाणी युवकाची हत्या । Murder in Talegaon Dabhade City