व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, July 1, 2025
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

आयपीएस सत्यसाई कार्तिक यांच्याकडून कारवायांचा धडाका ! अंमली पदार्थ, गांजा विक्री व बेकायदा जुगार खेळणाऱ्यांवर गुन्हे दाखल

“संकल्प नशामुक्ती अभियान”  अंतर्गत लोणावळा उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांनी लोणावळा उपविभागात कारवायांचा धडाका लावला आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
February 3, 2025
in लोकल, ग्रामीण, शहर
IPS Satyasai Karthik into action Mode Crimes filed against drug dealers ganja sellers and illegal gamblers

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : “संकल्प नशामुक्ती अभियान”  अंतर्गत लोणावळा उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांनी लोणावळा उपविभागात कारवायांचा धडाका लावला आहे. सत्यसाई कार्तिक यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी मागील एक आठवड्यात एम. डी. पावडर, गांजा विक्री करणारे, बेकायदा मटका आणि जुगार खेळणाऱ्यांच्या विरोधात कारवाया केल्या आहेत.

पहिल्या कारवाईत लोणावळा शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत जी वार्ड लोणावळा याठिकाणी ताबान पठाण या 28 वर्षीय युवकाला मेफेड्रॉन पावडर अर्थात एम डी पावडरची विक्री करत असताना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्या अंगझडतीमध्ये त्याच्या कडून ३.६२ ग्रॅम वजनाची एम डी पावडर जप्त करण्यात आली. त्याच्या विरुद्ध लोणावळा शहर पोलिस स्टेशन ला त्याच्या विरोधात NDPS एक्ट १९८५ चे कलम ८(क), २१(४) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • दुसऱ्या कारवाई मध्ये सत्यसाई कार्तिक यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी वरसोली टोलनाक्याजवळ नाकाबंदी लावून त्या ठिकाणावरून मोटारसायकल वर बसून गांजा घेऊन विक्रीसाठी जाणाऱ्या दोन जणांवर कारवाई केली. या कारवाई मध्ये अक्षय गोपीनाथ जाधव व प्रल्हाद आसाराम जाधव अशा दोघांवर गुंगीकारक औषधी द्रव्ये आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ चे (NDPS) कलम ८(क), २०(ब)(ii), BNS ३(५) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्याकडून १५.१२८ किलो गांजा सह १,६०,५१२ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

तिसऱ्या कारवाई मध्ये सत्यासाई कार्तिक यांनी लोणावळा शहर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये तुंगार्ली गावात एका बंगल्यात छापा टाकून त्याठिकाणी बेकायदेशीर जुगार खेळत असलेल्या तब्बल 14 जणांवर कारवाई केली. या सर्वांवर मुंबई जुगार कायदा १८८७ कलम ४, १२(अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. या कारवाई मध्ये एकूण ५,८३,९६२ रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– दुचाकी, चारचाकी वाहनांचे पक्के ड्रायव्हिंग लायसन्स पाहिजे? आरटीओकडून फेब्रुवारीचे वेळापत्रक जाहीर, पाहा आवश्यक कागदपत्रे
– पुणे जिल्हा नियोजन समितीची बैठक संपन्न ; 1 हजार 299 कोटींच्या प्रारूप आराखड्यास व 753 कोटींच्या अतिरिक्त मागणीस मान्यता
– तळेगाव शहर हादरले ! भरदिवसा गर्दीच्या ठिकाणी युवकाची हत्या । Murder in Talegaon Dabhade City


Previous Post

वेहेरगाव येथील जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा ; दहा जणांवर गुन्हा दाखल । Lonavala Gramin Police

Next Post

मावळ तालुक्यातील एकही आदिवासी बांधव घरकुलापासून वंचित राहता कामा नये – आमदार सुनिल शेळके

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
MLA Sunil Shelke public interaction tour to Chawsar Morve Tung village in Pawan Maval

मावळ तालुक्यातील एकही आदिवासी बांधव घरकुलापासून वंचित राहता कामा नये - आमदार सुनिल शेळके

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Maval Vidhan Sabha Former MLA Krishnarao Bhegde Passes Away Talegaon Dabhade

मावळचा आधारवड हरपला ! मावळभूषण, माजी आमदार कृष्णराव भेगडे यांचे निधन । Former MLA Krishnarao Bhegde Passes Away

June 30, 2025
Shri Sant Tukaram Cooperative Sugar Factory

श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे ऊस लागवडीबाबत धोरण जाहीर – वाचा सविस्तर

June 30, 2025
Pavana-Dam-Maval

पवना धरणात 58 टक्के पाणीसाठा ! गतवर्षीपेक्षा 40 टक्क्यांहून अधिक जलसाठा । Pawana Dam Updates

June 30, 2025
Gopinath Munde Farmers Accident Safety Sanugraha Grant Scheme Documents Procedure Information

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना : शेतकरी कुटुंबासाठी मोठा आर्थिक आधार !

June 30, 2025
Maval Taluka Marathi Journalists Association established Sudesh Girme elected as president see entire committee

मावळ तालुका मराठी पत्रकार संघाची स्थापना; अध्यक्षपदी सुदेश गिरमे, कार्याध्यक्षपदी विशाल विकारी यांची निवड – पाहा संपूर्ण कार्यकारिणी

June 30, 2025
10 foot python found in Boraj village Maval Wildlife conservationists release python into natural habitat

बोरज गावात आढळला 10 फुटी अजगर ; वन्यजीव रक्षकच्या सर्पमित्रांकडून अजगराची नैसर्गिक अधिवासात मुक्तता

June 30, 2025
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.