Dainik Maval News : आपण ज्या शाळेत शिकलो, खेळलो, मोठं झालो, ते माजी विद्यार्थी तब्बल 20 वर्षानंतर पुन्हा एकत्र आल्याने अनेकांचे डोळे आनंदाश्रूंनी पाणावले होते. वडगाव मावळ येथील रयत शिक्षण संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूल विद्यालयाच्या 2006-2007 दहावीच्या बॅचच्या आठवणी पुन्हा जागविण्यासाठी राज्यभर विखुरलेल्या विद्यार्थ्यांनी माजी विद्यार्थी मेळाव्यास आवर्जून हजेरी लावली होती. ज्या शाळेत शिकलो त्याच शाळेत पुन्हा एकत्र येवून त्याच वर्गात बसून विद्यार्थ्यांनी जुन्या आठवणीनं उजाळा दिला.
त्यांतर सर्व विद्यार्थी व शिक्षक वडगाव येथील राजमुद्रा बँक्वेट हॉलवरती एकत्र जमले त्यानंतर विद्यार्थीनींनी शिक्षकांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी भाऊसाहेब ढोरे, राजेंद्र सातकर, सुहास इंदलकर, मोनाली भेगडे, योगिता अहिरेकर, अतिश ढोरे आपले मनोगत व्यक्त केले. तसेच या स्नेहमेळाव्यला कुलूमकर सर, अहिरेकर सर, शेख सर, बसागरे सर, उबाळे सर, नेवसे सर, वंजारी सर, धुमाळ मॅडम, राउत मॅडम, गजरे मॅडम, कदम मॅडम, आडमुठे सर, वाघवले मॅडम, अनिल कोद्रे सर, जालिंदर ढोरे, परिठे सर, वनराज ढोरे आदींनी माजी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी कुलूमकर सर, धुमाळ मॅडम गजरे मॅडम, उबाळे सर आदींनी इतक्या वर्षांनी एकमेकांविषयी दाखवलेल्या आपुलकीचे कौतुक केले. माजी विद्यार्थ्यांनी शाळेच्या आठवणी सांगत शाळेविषयी कृतज्ञता व्यक्त केली. वय, पद, प्रतिष्ठा व व्यस्त दिनक्रम हे सर्व बाजूला ठेवून मैत्रीची भावना जोपासत विद्यार्थी आणि विद्यार्थिनी उत्साहात एकत्र जमले होते. तब्बल २० वर्षांनी भेटत असल्याने एकमेकांची ओळख लागते का नाही, ही भावना त्यांच्या मनामध्ये होती.
- परंतु, एकत्र आले, भेट झाली अन् सर्वांनी जल्लोष केला. यावेळी सर्वच माजी विद्यार्थ्यांनी आपल्या शालेय जीवनातील आठवर्णीना उजाळा दिला. एकत्रित केलेला अभ्यास, शिक्षकांचा वचक, खेळांच्या स्पर्धा, शिक्षकांनी दिलेली शिक्षा, नवनवीन उपक्रम अशा अनेक गप्पांच्या ओघात विद्यार्थी अक्षरशः आपले वयही विसरून गेले होते. यावेळी विद्यार्थ्यांनी एकत्र बसून स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला. तसेच एकमेकांना पुढील वाटचालीसाठी निरोगी व आनंददायी जीवनासाठी शुभेच्छा देत निरोप घेतला
कार्यक्रमाचे नियोजन श्रीधर मराठे भाऊ ढोरे,सतिश गाडे,सुहास इंदलकर,अतिश ढोरे,मोनाली वायकर,योगिता अहिरेकर, दिपाली भोंडवे,श्रीकांत महामुनी, रोहित भोर ,सतिश ढोरे, योगेश डुकरे रोहन डुकरे राजेंद्र सातकर, विनय लंवगारे प्रिया लचके, नितीन साळुंके, गौरव लोहर,सुवर्णा ओव्हाळ, रूपाली म्हळासकर,मैना ढमाले गीतांजली धोत्रे, रोहिणी निकम, निलिमा पिंपळे शुभांगी चव्हाण, सुषमा ठोंबरे,काजल सातकर, प्रतिका ढोरे, स्वप्निल आवटे आकाश टोपे आकाश चिवटे उमेश घारे, इमान शेख,तृप्ती भेगडे, रूपाली ढोरे, प्रिया लोखंडे, तृप्ती चव्हाण,यांनी केले तर सूत्रसंचालन मोनाली वायकर जगताप व सुहास इंदलकर यांनी केले.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– आम्हाला पैसे नको ! लाडक्या बहिणींना अर्ज पडताळणीची धास्ती, योजनेचा लाभ नको म्हणत ‘इतक्या’ बहिणींची माघार । Ladki Bahin Yojana
– आयपीएस सत्यसाई कार्तिक यांच्याकडून कारवायांचा धडाका ! अंमली पदार्थ, गांजा विक्री व बेकायदा जुगार खेळणाऱ्यांवर गुन्हे दाखल
– बोरघाटातील मिसिंग लिंक प्रकल्पाला ‘वीर हुतात्मा शिंग्रोबा धनगर’ यांचे नाव देण्याची मागणी । Mumbai Pune Missing Link