Dainik Maval News : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Yojana) बाबत एक महत्वाची माहिती समोर आली आहे. अपात्र लाडक्या बहिणींचे टेन्शन वाढविणारी ही माहिती आहे. जर तुमच्याकडे चारचाकी वाहन असेल आणि तरीही तुम्ही लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असाल तर तुमचे अर्ज बाद केले जाणार आहे.
ज्या लाडक्या बहिणींकडे चारचाकी वाहन आहे, त्या महिला या योजनेसाठी अपात्र होणार आहेत. या पडताळणीसाठी राज्य सरकारने नवीन मोहीम राबवली आहे. यात पर्यवेक्षिका आणि अंगणवाडी सेविका तुमच्या दारात अर्थात तुमच्या घरी येऊन चारचाकी वाहन आहे की नाही, याची पडताळणी केली जाणार आहे. जर तुमच्याकडे चारचाकी वाहन असल्याचे आढळले तर तुम्हाला योजनेचा लाभ सोडावा लागणार आहे.
- प्राप्त माहितीनुसार, महिला व बालकल्याण विभागाने याबाबत बैठक घेऊन राज्यातील सर्व अधिकाऱ्यांना ‘लाडक्या बहिणींच्या’ घरी जाऊन चारचाकी वाहन आहे किंवा नाही याची पडताळणी करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच परिवहन विभागाकडून वाहनधारकांची यादी घेऊन प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवण्यात आली आहे. त्यामुळे चारचाकी कोणत्या घरात आहे याची माहिती मिळेल. यामुळे पडताळणीचे काम सोपे होणार आहे
लाडक्या बहिणींसाठी निकष :
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र होण्यासाठी, महिलांचे वय हे 21 ते 65 वयोगटातील असावे. महिलांच्या कुटुंबातील कोणताही सदस्य सरकारी नोकरीत नसावा. महिलांच्या कुटुंबाचे उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असावे. महिलांच्या कुटुंबात चारचाकी वाहन नसावे. महिला कोणत्याही दुसऱ्या योजनेचा लाभ घेत नसावी. हे निकष आहेत. यामुळे जर एखादी महिला लाभार्थी ही या निकषात बसत नसेल तर तिला योजनेचा लाभ सोडावा लागणार आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– आम्हाला पैसे नको ! लाडक्या बहिणींना अर्ज पडताळणीची धास्ती, योजनेचा लाभ नको म्हणत ‘इतक्या’ बहिणींची माघार । Ladki Bahin Yojana
– आयपीएस सत्यसाई कार्तिक यांच्याकडून कारवायांचा धडाका ! अंमली पदार्थ, गांजा विक्री व बेकायदा जुगार खेळणाऱ्यांवर गुन्हे दाखल
– बोरघाटातील मिसिंग लिंक प्रकल्पाला ‘वीर हुतात्मा शिंग्रोबा धनगर’ यांचे नाव देण्याची मागणी । Mumbai Pune Missing Link