Dainik Maval News : संत तुकाराम महाराज यांचे अकरावे वंशज व प्रसिध्द व्याख्याते हभप शिरीष महाराज मोरे यांचे आज (दि.5 फेब्रुवारी) राहत्या घरी आकस्मिक निधन झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
प्रखर हिंदूत्ववादी विचारवंत, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक आणि शिवशंभो प्रतिष्ठानचे अध्यक्ष हभप शिरीष महाराज मोरे यांच्या अशा अकाली जाण्याने त्यांच्या सहकाऱ्यांना मोठा धक्का बसला आहे.
- प्राप्त माहितीनुसार, शिरीष महाराज मोरे यांचे बुधवारी (दि.5) सकाळी राहत्या घरी आकस्मिक निधन झाले. त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण समजलेले नाही. पोलीस तपासाअंती सर्व चित्र स्पष्ट होईल, असे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले आहे. दरम्यान, हे वृत्त कळताच देहू परिसरात शोककळा पसरली आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, शिवव्याख्याते म्हणून शिरीष मोरे यांचा मोठा लौकीक होता. नुकताच त्यांचा विवाह देखील ठरला होता व कुंकूमतिलक समारंभ देखील झाला होता. असे असताना त्यांच्या अशा अचानक निधनाच्या वृत्ताने सर्वत्र खळबळ माजली आहे.
प्रखर हिंदूत्ववादी विचारक
“ज्याच्या कपाळावर टिळा नाही, त्यांच्याकडून खरेदी करणे टाळा,” असे आवाहन शिरीष महाराज मोरे यांनी करीत आपल्या प्रखर हिंदूत्ववादी विचारांची जाणीव करून दिली होते. हिंदूंवर होणाऱ्या अन्याय अत्याचारावर ते कायम भाष्य करीत असत.
*संत तुकाराम महाराजांचे वंशज,राष्ट्रीय स्वयंसेवक संघांचे स्वयंसेवक ह.भ.प शिरीष महाराज मोरे यांचे आज आकस्मित निधन झाले*
*मोरे कुटुंबियांना हे दुःख सहन करण्याची शक्ती परमेश्वराने देवो व आत्म्यास सदगती मिळो हिचं परमेश्वरा चरणी प्रार्थना…*
*ॐ शांती*
*भावपूर्ण श्रद्धांजली💐*… pic.twitter.com/LI7eFPSipU— Nitesh Rane (@NiteshNRane) February 5, 2025
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– आम्हाला पैसे नको ! लाडक्या बहिणींना अर्ज पडताळणीची धास्ती, योजनेचा लाभ नको म्हणत ‘इतक्या’ बहिणींची माघार । Ladki Bahin Yojana
– आयपीएस सत्यसाई कार्तिक यांच्याकडून कारवायांचा धडाका ! अंमली पदार्थ, गांजा विक्री व बेकायदा जुगार खेळणाऱ्यांवर गुन्हे दाखल
– बोरघाटातील मिसिंग लिंक प्रकल्पाला ‘वीर हुतात्मा शिंग्रोबा धनगर’ यांचे नाव देण्याची मागणी । Mumbai Pune Missing Link