Dainik Maval News : जर तुम्ही कार खरेदी करण्याचा विचार करत असाल व तुमचं बजेट दहा लाखांपेक्षा कमी असेल, तर तुम्ही सीएनजी कार निवडणे हे योग्य राहील. सीएनजी कार उत्तम मायलेज आणि परफॉर्मन्ससाठी ओळखली जाते. त्यातही टाटा मोटर्सची पंच सीएजी ही कार ग्राहकांच्या सर्वाधिक पसंतीचा पर्याय ठरत आहे. (tata punch cng)
समोर आलेल्या आकडेवारीनुसार, 2024 वर्षांत टाटाची पंच ही कार सर्वाधिक विक्री झालेली कार ठरली आहे. विशेष म्हणजे सर्वसामान्यांना परवडणारी ही कार सीएनजी (tata punch cng) पर्यायातही उपलब्ध असून तिची किंमत 10 लाखापेक्षा कमी आहे.
सध्या अनेकजण पेट्रोल-डिझेल च्या वाढत्या किंमती लक्षात घेता सीएनजी कार घेण्याकडे वळत आहे. सीएनजी कारचे फायदेही अनेक आहेत. सीएनजी कार (tata punch cng) कमी खर्चात जास्त मायलेज देते व कमी प्रदूषण निर्माण करते. यामुळे तुम्ही जर कार खरेदीचा विचार करत असाल आणि तुम्हाला 10 लाखांच्या बजेटमध्ये उत्कृष्ट फीचर्ससह उत्तम मायलेज व परफॉर्मन्सवाली कार हवी असेल तर टाटा पंच सीएनजी ही कार तुम्ही नक्की निवडली पाहिजे.
Tata Punch मध्ये सीएनजी मॉडेल :
टाटा पंच ही बजेटमध्ये येणाऱ्या लोकप्रिय कारपैकी एक आहे. ही कार तुम्हाला पेट्रोल, इलेक्ट्रिक आणि सीएनजी अशा तीन पर्यायात उपलब्ध आहे. टाटा पंच iCNG आयकॉनिक ALFA आर्किटेक्चरवर आधारित आहे. तसेच या कारमध्ये उत्कृष्ट सेफ्टी फीचर्स आहेत. कारमध्ये iCNG किट देण्यात आले आहे, जे लीकपासून बचाव करते. कारची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे कारमध्ये गॅस गळती झाल्यास हे iCNG तंत्रज्ञान आपोआप सीएनजी (tata punch cng) मोडवरून पेट्रोल मोडकडे वळते. टाटा पंचची सुरुवातीची एक्स शोरूम किंमत 7,22,900 रुपये आहे. ही कार 26.99 किलोमीटर प्रति किलो मायलेज देऊ शकते.
आमच्याकडे टाटाच्या सर्वच कार विक्रीसाठी उपलब्ध आहेत. परंतु टाटा पंच या कारला ग्राहकांची सर्वाधिक पसंती मिळत आहे. पंच ही गेल्या वर्षी सर्वाधिक विक्री झालेली कार असून आताही या कारकडे ग्राहकांचा ओढा अधिक आहे. टाटा पंचचे सीएनजी व्हर्जन मावळमधील सर्वसामान्य नागरिकांना आर्थिकदृष्ट्या परवडणारे आहे. पंचजन्य ऑटोमोबाईलमध्ये विशेष ऑफरसह ही कार खरेदी करता येऊ शकते. – स्नेहल काळे, मॅनेजर, पंचजन्य ऑटोमोबाईल, तळेगाव दाभाडे
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– पुणे रिंग रोड : खासगी वाटाघाटीने भूसंपादन प्रक्रिया पार पडल्यास शेतकऱ्यांना 25 टक्के अतिरिक्त मोबदला । Pune Ring Road
– रावेत ते तळेगाव दाभाडे बीआरटी मार्ग बांधण्याचे नियोजन ; पीएमआरडीए हद्दीत सहा नवीन बीआरटी मार्गांचा पर्याय
– आंबी येथील ‘नव ताझ धाम’ वृद्धाश्रमाचे उदघाटन ; समाजात पुन्हा एकत्र कुटुंब पद्धती रुजवण्याची गरज – राज्यमंत्री माधुरी मिसाळ