Dainik Maval News : मावळ तालुक्यात ॲग्रीस्टॅक योजनेअंतर्गत शेतकऱ्यांचे फार्मर आयडी बनवून देण्याचे काम सध्या युद्ध पातळीवर सुरू आहे. प्रशासनाच्या माध्यमातून प्रत्येक गावात विशेष कॅम्प आयोजित करुन शेतकऱ्यांना फार्मर आयडी काढून दिले जात आहे. पवन मावळ विभागातील शिळींब गावात मागील काही दिवसांपासून शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना फार्मर आयडी बनविले जात आहेत.
शिळींब सारख्या दुर्गम भागात शेतकऱ्यांना विविध सरकारी योजनांचे लाभ घेताना अडचण येऊ नये याकरिता गेली दहा दिवसांत प्रशासनाने पाचवेळा विशेष कॅम्प घेतला आहे. तांत्रिक अडचणी व सर्व्हर डाऊनच्या समस्येवर मात करीत गावस्तरावरील कॅम्पमध्ये एकूण 95 शेतकऱ्यांचे फार्मर आयडी बनविले असून उर्वरित शेतकऱ्यांचे फार्मर आयडी बनविण्याचे काम सुरु असल्याची माहिती ग्राम महसूल अधिकारी शरद गाडे यांनी दिली.
फार्मर आयडी म्हणजे काय?
फार्मर आयडी म्हणजे शेतकऱ्यांचे डिजिटल ओळखपत्र. केंद्र सरकारच्या कृषी आणि शेतकरी विकास मंत्रालयाने अॅग्रीस्टॅक या उपक्रमांतर्गत शेतकऱ्यांना फार्मर आयडी देण्याचा निर्णय घेतला आहे.
फार्मर आयडीचा फायदा ;
केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध शेतीविषयक योजानंचा लाभ घ्यायचा असल्यास शेतकऱ्यांकडे शेतकरी ओळखपत्र (फार्मर आयडी) असणे आवश्यक आहे. केंद्र सरकारच्या कृषी आणि शेतकरी विकास मंत्रालयाकडून अॅग्रीस्टॅक या डिजीटल उक्रमाद्वारे शेतकऱ्यांना ओळखपत्र देण्यासंदर्भात निर्णय घेतला गेला आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– पुणे रिंग रोड : खासगी वाटाघाटीने भूसंपादन प्रक्रिया पार पडल्यास शेतकऱ्यांना 25 टक्के अतिरिक्त मोबदला । Pune Ring Road
– रावेत ते तळेगाव दाभाडे बीआरटी मार्ग बांधण्याचे नियोजन ; पीएमआरडीए हद्दीत सहा नवीन बीआरटी मार्गांचा पर्याय
– आंबी येथील ‘नव ताझ धाम’ वृद्धाश्रमाचे उदघाटन ; समाजात पुन्हा एकत्र कुटुंब पद्धती रुजवण्याची गरज – राज्यमंत्री माधुरी मिसाळ