Dainik Maval News : तक्रार मागे घेण्यासाठी बांधकाम व्यावसायिकाकडे खंडणी मागितल्या प्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींनी बांधकाम व्यावसायिकाकडे ४० लाख रुपयांची मागणी करीत धमकी दिली. हा प्रकार गुरुवारी (दि. २०) उघडकीस आला.
- प्रदीप वसंतराव चव्हाण (वय ५४, रा. देहूरोड) यांनी गुरुवारी (दि. २०) देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे, त्यानुसार, किरण परशुराम गवळी (वय ३६. रा. पारशी चाळ, देहूरोड), सचिन देशपांडे (वय ४०, रा. तळेगाव दाभाडे), धनराज शिंदे (वय ५२, रा. देहूरोड बाजार) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी प्रदीप चव्हाण यांचे रावेत येथे तत्व रेसिडेन्सी नावाने गृहप्रकल्पाचे बांधकाम सुरू आहे. आरोपींनी बांधकाम बंद करण्याच्या उद्देशाने विविध सरकारी कार्यालये आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या बांधकाम विभागात तक्रारी केल्या होत्या.
सदर तक्रारी मिटवण्यासाठी आरोपींनी आपसात संगनमत करून फिर्यादी यांच्याकडे ४० लाख रुपयांची खंडणी मागितली. पैसे न दिल्यास जिवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे. देहूरोड पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– देहू नगरपंचायतीचा 97 कोटी 99 लाखाचा अर्थसंकल्प सादर, विशेष सभेत अर्थसंकल्प मंजूर । Dehu News
– तळेगाव-चाकण महामार्गाच्या कामाला मंत्रिमंडळाची मंजुरी मिळावी ; कृती समितीचे मुख्यमंत्र्यांना निवेदन । Maval News
– मोठी बातमी ! ‘पीएमआरडीए’चा मोठा निर्णय, आता नऊ तालुक्यांत होणार PMRDA चे कार्यालय, मावळचाही समावेश