सध्याची तरुणाई ही सोशल मीडियाच्या किती आहारी गेली आहे, याचे एक धक्कादायक उदाहरण समोर आले आहे. पुणे – लोणावळा रेल्वे मार्गावर स्टंटबाजी करणाऱ्या दोन तरुणांना पोलिसांनी अटक केली आहे. देहूरोड ते शेलारवाडी दरम्यान या तरुणांनी रेल्वे रुळावर झोपून फोटोशूट आणि व्हिडिओ शूट केले होते. रेल्वे पोलिसांना याची खबर लागताच त्यांनी सदर तरुणांना खाकीचा दणका दिला आहे. ( Railway Police Arrest Two Youth For Doing Stunt On Pune Lonavala Railway Track )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
विक्रम राठोड आणि महेश रबारी अशी या तरुणांची नावे आहेत. आरपीएफ पोलिस निरीक्षक अमित कुमार यांच्या पथकाने ही कारवाई केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट करण्यासाठी दोन तरुण रेल्वे रुळावर स्टंटबाजी करत होते. देहूरोड ते शेलारवाडी दरम्यान रेल्वे रुळावर ही घटना घडली. रेल्वे रुळावर स्टंटबाजी करत व्हिडिओ आणि फोटो काढत असतानाच या दोघांना ताब्यात घेण्यात आले. तरुणांनी अशा प्रकारची स्टंटबाजी टाळावी, असे आवाहनही अमित कुमार यादव यांनी केले आहे.
अधिक वाचा –
– दुपारची लोकल रेल्वे सेवा पुर्ववत करा, तळेगाव दाभाडे रेल्वे स्टेशनवर आंदोलन
– शिळींब ते घुसळखांब रस्ता, आंबेगाव ते दुधिवरे खिंड रस्ता आदी विकासकामांबाबत आढावा बैठक