कोरोना काळात बंद करण्यात बंद करण्यात आलेली लोकल रेल्वे सेवा कोरोना निर्बंध हटवत असताना हळूहळू पूर्ववत करण्यात आली. सध्या कोरोनाचे कोणतेही निर्बंध सार्वजनिक जिवनात वावरताना असल्याचे दिसत नाही. अशावेळी लोकल रेल्वे सेवाही पुर्वीप्रमाणे सुरु होणे अपेक्षित आहे. मात्र, मागील सहा महिन्यांपासून मावळ तालुक्यातील पुणे ते लोणावळा लोकल रेल्वे ( Pune to Lonavala Local Railway ) मार्गावरील दुपारची रेल्वे सेवा बंद असलेली दिसत आहे. रेल्वे प्रवाश्यांनी, संघटनांनी आणि अनेक नेत्यांनी याबाबत अनेकदा पत्रव्यवहार केला, निवेदने दिली मात्र तरीही दुपारच्या लोकल रेल्वेच्या फेऱ्या काही सुरु होताना दिसत नाहीत. त्यामुळे गुरुवारी (24 नोव्हेंबर) रोजी तळेगाव दाभाडे रेल्वे स्टेशन ( Talegaon Dabhade Railway Station ) येथे प्रवासी संघटना आणि प्रवासी यांच्यावतीने आंदोलन करण्यात आले.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
गुरुवारी (24 नोव्हेंबर) रोजी सकाळी तळेगाव दाभाडे रेल्वे स्टेशनवर हे आंदोलन करण्यात आले. यावेळी मावळ तालुक्यातील हजारो विद्यार्थी, कामगार, शेतकरी, दुग्ध व्यवसायिक, व्यापारी यावेळी उपस्थित होते. दुपारच्या वेळी शाळा महाविद्यालयातील विद्यार्थी, व्यापारी आदींना लोकल सेना नसल्याने तासंतास वाट पहावी लागते. खोळंबून रहावे लागते. त्यामुळे दुपारीही लोकल फेरी असावी किंवा ती पूर्वीसारखी सुरु करावी, यासाठी यापूर्वी अनेकदा आंदोलने आणि निवेदन देण्यात आले होते. अखेर गुरुवारी तळेगाव दाभाडे स्टेशनवर लोकल रेल्वे रोको आंदोलन करून रेल्वे स्टेशन व्यवस्थापक प्रशांत लंका यांना निवेदन देण्यात आले. ( Agitation at Talegaon Railway Station For to Start Rounds In Afternoon Time Of Pune to Lonavala Local Railway )
अधिक वाचा –
– लोणावळा जवळील वलवण पुलावर टेम्पोची अज्ञात वाहनाला धडक, टेम्पो चालकाचा उपचारादरम्यान मृत्यू
– ‘सत्ताधाऱ्यांच्या आदेशाने रस्त्याची रुंदी आणि दिशा बदलल्यास…काम थांबवू’, वडगाव भाजपचा सार्वजनिक बांधकाम विभागाला इशारा