Dainik Maval News : श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखाना संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक प्रक्रिया आज, सोमवारपासून (दि.3) सुरू होणार असून, दिनांक 5 एप्रिलला मतदान होणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी मुकुंद पवार यांनी दिली.
मावळ, मुळशी, हवेली, खेड व शिरूर अशा पाच तालुक्यांचे कार्यक्षेत्र असलेल्या श्री संत तुकाराम साखर कारखान्यात एकूण 22 हजार 258 मतदारसंख्या असून 21 संचालक कार्यरत आहेत. संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी 3 ते 7 मार्चपर्यंत सकाळी 11 ते दुपारी 3 या वेळेत समिती सभागृह, पहिला मजला, साखर संकुल, शिवाजीनगर, पुणे येथे नामनिर्देशन पत्र विक्री व स्वीकृती होणार आहे.
दहा मार्चला नामनिर्देशन पत्राची छाननी
प्राप्त नामनिर्देशन पत्राच्या छाननीची प्रक्रिया 10 मार्च रोजी सकाळी 11 वाजल्यापासून कामकाज संपेपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. तसेच, नामनिर्देशन पत्र मागे घेण्यासाठी दिनांक 25 मार्चपर्यंत दुपारी 3 वाजेपर्यंत वेळ देण्यात आली आहे. त्यानंतर दिनांक 26 मार्च रोजी अंतिम विधीग्राह्य नामनिर्देशन पत्रांची यादी प्रसिद्ध करणे व पात्र उमेदवारांना निशाणी (निवडणूक चिन्ह) वाटपाची कार्यवाही निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात करण्यात येणार आहे.
पाच एप्रिलला मतदान
दिनांक 5 एप्रिल रोजी सकाळी 8 ते सायंकाळी 5 या वेळेत मतदानप्रक्रिया घेण्यात येणार असून, मतमोजणी दिनांक 6 एप्रिल रोजी होणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी पवार यांनी दिली.
मतदारसंघ व प्रतिनिधी संख्या :
1. व्यक्ती उत्पादक सभासद – गट नंबर 1 हिंजवडी-ताथवडे (संचालक संख्या 3), गट नंबर 2 पौड-पिरंगुट (संचालक संख्या 3), गट नंबर 3 तळेगाव-वडगाव (संचालक संख्या 3) गट नंबर 4 सोमाटणे-पवनानगर (संचालक संख्या 3), गट नंबर ५ खेड-हवेली-शिरूर (संचालक संख्या 4).
2. अनुसूचित जाती/जमाती (संचालक संख्या 1)
3. महिला राखीव प्रतिनिधी (संचालक संख्या 2)
4. इतर मागासवगीय प्रतिनिधी (संचालक संख्या 1)
5. विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग प्रतिनिधी (संचालक संख्या 1)
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– 40 कोटीची पाणीपुरवठा योजना, 7.5 कोटीचे शॉपिंग सेंटर, संपूर्ण शहरात सीसीटीव्ही कॅमेरे – वाचा वडगाव नगरपंचायतीच्या अर्थसंकल्पाची वैशिष्ट्ये
– लोणावळा शहर व ग्रामीण हद्दीतील 5 पानटपऱ्यांवर पोलिसांची कारवाई ; विद्यार्थ्यांना पानामधून अंमली पदार्थांची विक्री होत असल्याचा संशय
– अजित पवारांच्या मावळातील पदाधिकाऱ्याचे कृत्य ; जन्मदात्रीला केली मारहाण, आईने माध्यमांसमोर येत केले पितळ उघडे