लोणावळा शहरात ( Lonaval City) जवळ खंडाळा ( Khandala ) येथे एक हृदयद्रावक घटना घडली आहे. आज ( रविवार, दिनांक 27 नोव्हेंबर) रोजी सकाळच्या सुमारास लोणावळा जवळील खंडाळा येथील पिचली हिल बार्क हॉटेलच्या पाठीमागे कार्निवल विला बंगलो येथे स्विमिंग पूलमध्ये पडून एका चिमुकल्या मुलीचा दुर्दैवी अंत झाला आहे. ( Little Girl Dies After Drowning In Swimming Pool )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर मुलीचे वडील मोहम्मदनदिम कैसरहुसेन सैयद (वय – 31 वर्षे, रा. डोंबिवली) यांनी या प्रकरणी लोणावळा शहर पोलिसांत माहिती दिली. त्यानुसार त्यांची मुलगी हानियाझैरा मोहम्मदनदिम सैयद (वय – 1 वर्षे 11 महिने ) ही स्विमिंग पूलमध्ये पडली. घरातील सर्वजण नाष्टा करत असताना हा प्रकार घडला. नाष्टा करत असताना त्यांना हानियाझैरा हिचा ओरडण्याचा आवाज आला. त्यांनी तत्काळ बाहेर धाव घेतली, तेव्हा त्यांना मुलगी पाण्यात पडलेली दिसली. त्यांनी तिला लगेचच संजीवनी हॉस्पिटल, लोणावळा येथे नेले. मात्र, डॉक्टरांनी तीचा मृत्यू झाल्याचे जाहीर केले. सदर प्रकरणाचा पुढील तपास पीएसआय मुजावर हे करत आहेत.
अधिक वाचा –
– लोणावळा शहर भाजपाच्या वतीने स्वाक्षरी मोहीम अभियान, वाचा काय आहे कारण?
– सोशल मीडियाचा नाद लईच बेक्कार..! रेल्वे रुळावर झोपून फोटो-व्हिडिओ काढणाऱ्या तरुणांना अटक, देहूरोड-शेलारवाडी दरम्यानची घटना