Dainik Maval News : तळेगाव दाभाडे शहरातील ऐतिहासिक गाव तळ्यामध्ये गेल्या काही महिन्यांपासून दूषित सांडपाणी जाऊन संपूर्ण तळ्यावर जलपर्णीने वेढा घातला होता. परिसरात यामुळे मोठी दुर्गंधी पसरली होती. याबाबत पर्यावरण प्रेमी नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती.
तळ्यावरील जलपर्णी काढून साफसफाई करण्याची मागणी नागरिकांनी नगरपरिषदेकडे केली होती. अखेर सोमवारपासून नगरपरिषदेने जलपर्णी काढण्यास सुरुवात केली आहे.
- ऐतिहासिक तळ्यात मोठ्या प्रमाणावर जलपर्णी साठल्याने तळ्यातील जलचर मरून पडले होते. परिसरातही मोठी दुर्गंधी पसरली होती. डासांचे प्रमाणही वाढले होते. नागरिकांचे आरोग्यामुळे धोक्यात आले होते. त्यामुळे स्थानिक नागरिक व पर्यावरणप्रेमींमध्ये नाराजी पसरली होती.
तळ्यातील जलपर्णी काढून साफसफाई करावी, अशी मागणी तीन महिन्यांपासून नागरिकांनी नगरपरिषदेकडे केली होती. अखेर नगरपरिषदेने सोमवारपासून जलपर्णी काढण्यास सुरवात केली आहे. मावळ तालुका मच्छीमार संघटना, तळेगाव येथील भोई समाजातील नागरिकांनी जलपर्णी काढण्यास मदत केली. संपूर्ण तळ्यातील जलपर्णी काढण्यास दोन ते तीन महिने लागणार आहेत.
जलपर्णी काढून पाण्याची गुणवत्ता सुधारणे, एरिएटर करणे, तळ्यामध्ये कारंजे उभारणे आदी पर्यावरणबाबी करण्यास पणन मंडळाने परवानगी दिली आहे. त्यानुसार सोमवारपासून तळ्यातील जलपर्णी काढण्यास सुरवात केली आहे, अशी माहिती नगर परिषदेचे आरोग्य निरीक्षक तुकाराम मोरमारे यांनी दिली.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मावळात ‘पुष्पा’चा कंटेनर पकडला ; शिरगावजवळ कोट्यवधीचे रक्त चंदन जप्त, आंतरराष्ट्रीय तस्करी रॅकेटचा पर्दाफाश
– संत तुकाराम साखर कारखान्याच्या निवडणुकीचे बिगूल वाजले ! आजपासून निवडणूक प्रक्रिया सुरू – वाचा सविस्तर
– दिलासादायक : तळेगाव-चाकण-शिक्रापूर परिसरातील वाहतूक कोंडी सुटणार, विकास प्रकल्पांसाठी राज्य सरकार सकारात्मक