व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, October 26, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

शेतकऱ्यांसाठी काँग्रेस उतरली रस्त्यावर ; वडगाव तहसील कार्यालयावर मोर्चा, आश्वासनांची पूर्तता करून बळीराजाला न्याय देण्याची मागणी

सोमवारपासून सुरु झालेल्या विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या अनुषंगाने शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे राज्यकर्त्यांचे लक्ष वेधण्यासाठी सोमवारी (दि.३) संपूर्ण राज्यभरात काँग्रेस (आय) पक्षाकडून आंदोलन करण्यात आले.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
March 5, 2025
in लोकल, ग्रामीण, मावळकट्टा, शहर
Congress Party holds protest at Vadgaon Maval regarding various issues of farmers

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : संपूर्ण राज्यात शेतकऱ्यांचे विविध प्रश्न गेल्या काही वर्षांपासून प्रलंबित आहेत. यातही मागील काळातील शिंदे-फडणवीस सरकार व आता नव्याने स्थापन झालेले महायुती सरकार यांच्या काळात शेतकऱ्यांना देण्यात आलेल्या अनेक आश्वासनांची पूर्तता झाली नाही. या सर्व पार्श्वभूमीवर सोमवारपासून सुरु झालेल्या विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या अनुषंगाने शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे राज्यकर्त्यांचे लक्ष वेधण्यासाठी सोमवारी (दि.३) संपूर्ण राज्यभरात काँग्रेस (आय) पक्षाकडून आंदोलन करण्यात आले.

  • मावळ तालुक्यातही काँग्रेस (आय) पक्षाने राज्यभरातील व विशेषतः स्थानिक शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांबाबत वडगाव मावळ येथे तीव्र आंदोलन केले. काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष यशवंत मोहोळ यांच्या नेतृत्वात पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक यांनी श्री पोटोबा महाराज मंदिर ते तहसील कार्यालय असा पायी मोर्चा काढला, यानंतर तहसीलदार विक्रम देशमुख यांची भेट घेऊन त्यांना आपल्या विविध मागण्याचे निवेदन सादर केले.

ग्रामदैवत श्री पोटोबा महाराज मंदिरापासून काढण्यात आलेल्या मोर्चात काँग्रेसच ज्येष्ठ नेते चंद्रकांत सातकर, तालुकाध्यक्ष यशवंत मोहोळ, बाळासाहेब ढोरे, अॅड. खंडूजी तिकोने, राजू शिंदे, राजेश वाघोले, महादू खांदवे, रुपाली क्षीरसागर, वैशाली फाटक आदींसह कार्यकर्ते सहभागी होते

राज्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न, महिलांवर अत्याचार वाढत आहेत. युती सरकारने निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफीचे आश्वासन दिले होते. त्याची पूर्तता अजूनही करण्यात आलेली नाही. मावळ तालुक्यात आजही शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न प्रलंबित असून सत्ताधारी फक्त आश्वासन देत असल्याचा आरोप यावेळी आंदोलकांनी कोपरा सभेत केला.

तसेच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेंतर्गत प्रलंबित लाभार्थ्यांना न्याय द्यावा, पवना धरणग्रस्त व तालुक्यातील इतर धरणग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई द्यावी, भूखंडाचे वाटप तातडीने करावे. संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ योजना तातडीने सुरू कराव्यात. भूमी अभिलेख कार्यालयातील शेतकऱ्यांची कामे, मोजणीची प्रकरणे मार्गी लावावीत आदी मागण्यांचे निवेदन तहसीलदार विक्रम देशमुख यांना देण्यात आले.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मावळात ‘पुष्पा’चा कंटेनर पकडला ; शिरगावजवळ कोट्यवधीचे रक्त चंदन जप्त, आंतरराष्ट्रीय तस्करी रॅकेटचा पर्दाफाश 
– संत तुकाराम साखर कारखान्याच्या निवडणुकीचे बिगूल वाजले ! आजपासून निवडणूक प्रक्रिया सुरू – वाचा सविस्तर
– दिलासादायक : तळेगाव-चाकण-शिक्रापूर परिसरातील वाहतूक कोंडी सुटणार, विकास प्रकल्पांसाठी राज्य सरकार सकारात्मक


dainik maval jahirat

Previous Post

कर वसुलीसाठी वडगाव नगरपंचायतीचे परफेक्ट नियोजन ; पाच पथके तैनात, थकबाकीदारांवर दंडात्मक कारवाई, नळजोड तोडण्याची तयारी

Next Post

तळेगावातील ऐतिहासिक गाव तळ्यातील जलपर्णी काढण्यास सुरूवात ; संपूर्ण स्वच्छतेसाठी दोन महिने लागणार । Talegaon Dabhade

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Removal of water plants from the pond in Talegaon Dabhade city has begun

तळेगावातील ऐतिहासिक गाव तळ्यातील जलपर्णी काढण्यास सुरूवात ; संपूर्ण स्वच्छतेसाठी दोन महिने लागणार । Talegaon Dabhade

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Document registration Dast Nondani

सामायिक सातबारा असलेल्या जमिनींच्या विक्रीसाठी राज्यात नवा नियम; यापुढे ‘ही’ कागदपत्रे नसल्यास दस्त नोंदणी होणार नाही

October 25, 2026
Pune-Lonavla-Local

पुणे – लोणावळा लोकल प्रवाशांसाठी महत्वाची बातमी! रविवारी रेल्वे ब्लॉक, लोकलच्या फेऱ्या रद्द, एक्सप्रेसच्या वेळांत बदल

October 24, 2026
Pune Zilla Parishad

दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत मावळ, मुळशीचा समावेश करावा; पुणे जिल्हा परिषदेत ठराव एकमताने मंजूर

October 24, 2026
30-foot-tall saffron flag has been hoisted on Tikona fort in Pavan Maval region

पवन मावळातील किल्ले तिकोणा गडावर ३० फूट उंच भगवा ध्वजाची उभारणी

October 24, 2026
Khel Rangla Paithanicha event organized at Shri Marimata Temple Talegaon Dabhade

तळेगाव दाभाडे : श्री मरिमाता मंदिर येथे “खेळ रंगला पैठणीचा” कार्यक्रमाचे आयोजन

October 23, 2026
Prompt action by Kamshet police Four missing minors located within just three hours Maval Crime

कामशेत पोलिसांची तत्पर कामगिरी! हरवलेल्या चार अल्पवयीन बालकांचा अवघ्या तीन तासांत शोध ; पालकांच्या स्वाधीन

October 23, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.