Dainik Maval News : जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, पुणे व पंचायत समिती (शिक्षण विभाग) पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने “शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षण 2.0 हे मावळ तालुक्यातील इयत्ता पहिली ते बारावी वर्गात शिकविणारे शिक्षक यांच्यासाठी तिसऱ्या टप्प्याचे प्रशिक्षण दिनांक 3 मार्च 2025 ते 7 मार्च 2025 या कालावधीत तळेगाव दाभाडे येथील माऊंट सेंट हायस्कूल या ठिकाणी पार पडले.
या प्रशिक्षण सत्रात तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूल, तळेगाव दाभाडेचे मुख्याध्यापक रावसाहेब किसन सिरसट यांनी आपली भूमिका पार बजावली. यावेळी मावळ तालुक्यातील बहुसंख्य शिक्षक बंधू आणि भगिनी उपस्थित होते.
मार्गदर्शनाबद्दल रावसाहेब सिरसट यांना जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था पुणे येथील वरिष्ठ अधिव्याख्याता प्राध्यापक विकास गरड व मावळ तालुक्याचे शिक्षणाधिकारी सुदाम वाळुंज यांनी प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. श्री डोळसनाथ महाराज शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष संतोष खांडगे व सचिव मिलिंद शेलार यांनी शिरसट यांचे कौतुक केले.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– भांगरवाडी रेल्वे उड्डाणपुलाबाबत नवीन डेडलाईन ; 10 एप्रिलपर्यंत भूसंपादन पूर्ण करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश । Lonavala News
– संत तुकाराम महाराज सदेह वैकुंठगमन त्रिशतकोत्तर अमृतमहोत्सव सोहळा ; भंडारा डोंगर येथे आजपासून गाथा पारायण व कीर्तन महोत्सव
– रसायनमिश्रीत सांडपाणी नदीत सोडणाऱ्या उद्योगांवर कठोर कारवाई ; पवना, इंद्रायणी नदी प्रदूषणावर पर्यावरण मंत्र्यांची भूमिका