Dainik Maval News : श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखाना संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक होत असून निवडणूक कार्यक्रम पत्रिकेनुसार नामनिर्देशन भरणे, छाननी आदी प्रकिया सुरू आहे. दिनांक 7 मार्च रोजी अखेरच्या दिवसापरयंत भरण्यात आलेल्या एकूण अर्जापैकी मंगळवारी छाननीत 5 अर्ज बाद झाले, तर दोन दोन अर्ज भरलेल्यांचे एक एक अर्ज बाद करण्यात आले. यासह एकूण 195 अर्ज वैघ ठरले आहेत.
सद्यस्थितीत संचालक मंडळाच्या 21 जागांसाठी आता 195 उमेदवारी अर्ज वैध ठरले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी मुकुंद पवार यांनी दिली. इच्छुकांमध्ये विविध पक्षांतील वरीष्ठ पदाधिकाऱ्यांनी आपले उमेदवारी अर्ज भरले आहेत. या इच्छुकांना माघार घेण्यास लावणे ही पक्षश्रेष्ठींपुढे मोठी डोकेदुखी ठरणार आहे. त्यामुळे यंदाची कारखाना निवडणूक बिनविरोध होणार की चुरशीची होणार याचा फैसला 25 मार्चला होणार आहे.
- कारखान्याच्या निवडणूकीसाठी 226 जणांनी उमेदवारी अर्ज भरले होते. त्यातील 26 अर्ज दुबार भरलेले होते. मुळशी तालुक्यातील पौड-पिरंगुट आणि हिंजवडी-ताथवडे गटात प्रत्येकी 17 अर्ज वैध झाले आहेत. मावळ तालुक्यातील तळेगांव-वडगाव गटात 23 आणि सोमाटणे पवनानगर गटात 37 अर्ज वैध राहिले आहेत.
खेड-हवेली-शिरूर मतदार संघात 30 अर्ज वैध झाले. महिला राखीव गटात 20, अनुसुचित जाती/जमाती गटात 8, इतर मागासवर्गीय गटात 35 तर विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गात 8 जणांचे अर्ज वैध ठरले आहेत. 25 मार्च ही अर्ज माघारीची शेवटची तारीख आहे.
23 हजार मतदार
मावळ तालुक्यात तळेगाव-वडगाव मतदार संघ 2 हजार 215, सोमाटणे पवनानगर मतदार संघात 3 हजार 21 असे एकूण 5 हजार 236 मतदार आहेत. मुळशीतील पौड पिरंगुट 3 हजार 546, हिंजवडी-ताथवडे 3 हजार 308 असे एकूण 6 हजार 854 मतदार आहेत तसेच अन्य खेड हवेली व शिरूर असे ऊस उत्पादक व अनुउत्पादक मिळून एकूण 22 हजार 917 सभासद या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– भांगरवाडी रेल्वे उड्डाणपुलाबाबत नवीन डेडलाईन ; 10 एप्रिलपर्यंत भूसंपादन पूर्ण करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश । Lonavala News
– संत तुकाराम महाराज सदेह वैकुंठगमन त्रिशतकोत्तर अमृतमहोत्सव सोहळा ; भंडारा डोंगर येथे आजपासून गाथा पारायण व कीर्तन महोत्सव
– रसायनमिश्रीत सांडपाणी नदीत सोडणाऱ्या उद्योगांवर कठोर कारवाई ; पवना, इंद्रायणी नदी प्रदूषणावर पर्यावरण मंत्र्यांची भूमिका