Dainik Maval News : लोणावळ्यातून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. लोणावळा शहर हद्दीतील वलवण गावातील वलवण तलावात बुडून एका अल्पवयीन मुलाचा मृत्यू झाला आहे. आज, बुधवार (दि. १२ मार्च ) रोजी सायंकाळच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. सिद्धार्थ गणेश गरूड असे तलावात बुडून मृत्यू पावलेल्या मुलाचे नाव आहे.
दोन मुले बुडाली, एकाचा वाचविण्यात यश
दरम्यान घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, दोन मित्र एक कायाक घेऊन तलावात उतरली होती. तलावात आत गेल्यानंतर त्यांनी पाण्यात उड्या घेतल्या व पोहोत पोहोत काठावर येऊ लागली. परंतु त्यांची दमछाक झाली व ते बुडू लागले. त्यावेळी तलावाच्या काठी असलेल्या काही जणांनी मुलांना वाचविण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने एका मुलाला वाचविण्यात आले, परंतु दुर्दैवाने दुसरा अल्पवयीन मुलगा, सिद्धार्थ गरूड याचा बुडून मृत्यू झाला.
लोणावळा शहर हद्दीतील ही घटना आहे. सदर घटनेची माहिती मिळताच शिवदुर्ग रेस्कू टीम घटनास्थळी आली व शोधकार्य मोहीम राबवून पाण्यात बुडालेल्या मुलाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. सुनिल शिरसाठ, यश सोनावणे, महेश मसने, योगेश दळवी, कपिल दळवी, अतुल सुतार, सचिन साठे, राजेंद्र कदम, मयुर दळवी, सागर कुंभार, विनायक टेमघरे, वैष्णवी भांगरे, अनिल आंद्रे, गणेश म्हसकर, पिंटु मानकर, सुनिल गायकवाड यांनी शोधकार्यात सहभाग घेतला.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– भांगरवाडी रेल्वे उड्डाणपुलाबाबत नवीन डेडलाईन ; 10 एप्रिलपर्यंत भूसंपादन पूर्ण करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश । Lonavala News
– संत तुकाराम महाराज सदेह वैकुंठगमन त्रिशतकोत्तर अमृतमहोत्सव सोहळा ; भंडारा डोंगर येथे आजपासून गाथा पारायण व कीर्तन महोत्सव
– रसायनमिश्रीत सांडपाणी नदीत सोडणाऱ्या उद्योगांवर कठोर कारवाई ; पवना, इंद्रायणी नदी प्रदूषणावर पर्यावरण मंत्र्यांची भूमिका