Dainik Maval News : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम-किसान) योजनेच्या अनुषंगाने शेतकऱ्यांच्या मोबाईलवर PM Kisan list. APK किंवा PM Kisan APK या संदेशाची लिंक उघडताच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात असलेली रक्कम गायब होते, अशी माहिती मिळाली असून शेतकऱ्यांनी अज्ञात एपीके फाईल किंवा लिंक डाऊनलोड करू नयेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
अशा प्रकारच्या आर्थिक फसवणुकीच्या घटनांच्या प्रतिबंधक उपाययोजनांसाठी शेतकरी बांधवांनी काळजी घ्यावी. शेतकऱ्यांनी अधिकृत संकेतस्थळ आणि अॅपचाच वापर करावा. कोणतीही अज्ञात APK फाईल किंवा लिंक डाउनलोड करू नये. संशयास्पद लिंक आणि संदेशापासून सावध रहावे.
कोणत्याही अनोळखी क्रमांकावरून आलेला पीएम- किसान संबंधित लिंक असलेला संदेश उघडू नये. कोणत्याही अनोळखी क्रमांकावरून आलेल्या कॉलवर बँक खाते किंवा आधार क्रमांक सांगू नये. फसवणूक झाल्यास सायबर गुन्हे तक्रार संकेतस्थळ https://cybercrime.gov.in वर तक्रार करावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे यांनी केले आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– अर्थसंकल्पात घोषणा होते, पण वर्षानुवर्षे काम होत नाही ; तिसऱ्या व चौथ्या रेल्वे ट्रॅकसाठी तातडीने भूसंपादन करा
– तळेगाव-चाकण-शिक्रापूर मार्गावरील अतिक्रमणे ‘पीएमआरडीए’च्या रडारवर ; कारवाईस प्रारंभ
– तळेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्याला लाच स्वीकारताना अटक ; एसीबीच्या पथकाची कारवाई