व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, July 23, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

अर्थसंकल्पात घोषणा होते, पण वर्षानुवर्षे काम होत नाही ; तिसऱ्या व चौथ्या रेल्वे ट्रॅकसाठी तातडीने भूसंपादन करा

कर्जत ते लोणावळा, लोणावळा ते पुणेपर्यंत तिसरी आणि चौथी मार्गिका करा ; खासदार श्रीरंग बारणे यांची लोकसभेत मागणी

Team Dainik Maval by Team Dainik Maval
March 19, 2025
in देश-विदेश, ग्रामीण, ग्रामीण, पुणे, महाराष्ट्र, मावळकट्टा, लोकल, शहर, शहर
mp shrirang barne

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : पुणे ते लोणावळा दरम्यानची तिसरी आणि चौथी मार्गिका जमीन अधिग्रहण न झाल्याने रखडली आहे. पनवेलमध्ये देशातील सर्वात मोठे विमानतळ होत आहे. त्यामुळे कर्जत ते लोणावळा आणि लोणावळा ते पुण्यापर्यंत तिसऱ्या आणि चौथ्या मार्गिकेचे काम करावे. त्यामुळे पनवेल पासून थेट पुण्यापर्यंत जलद रेल्वे धावू शकतात. दुपारी दीड वाजता लोणावळावरून पुण्याला जाणारी लोकल पुन्हा सुरू करावी. अमृत भारत योजनेत कर्जत आणि नेरळ रेल्वे स्थानकाचा समावेश करण्याची मागणी मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी लोकसभेत केली.

केंद्र सरकारच्या २०२५-२६ या अर्थसंकल्पावरील चर्चेत खासदार श्रीरंग बारणे सहभाग घेतला. शिवसेनेच्या वतीने अर्थसंकल्पावर चर्चा केली. अर्थसंकल्पाचे स्वागत करतानाच मतदारसंघातील प्रलंबित रेल्वे प्रश्न पुन्हा एकदा सभागृहात मांडले.

  • खासदार श्रीरंग बारणे म्हणाले, अर्थसंकल्पात रेल्वेच्या विकासासाठी महत्वपूर्ण पाऊले उचलली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या कार्यकाळात रेल्वेचे मोठे काम झाले. अनेक वर्षे ही कामे झाली नव्हती. रेल्वेच्या आधुनिकीकरणासाठी अर्थसंकल्पात २.५२ लाख कोटी रुपये देण्यात आले आहेत. मागील काही अर्थसंकल्पाच्या तुलनेत चार पटीने जास्त हा निधी आहे. पुढील तीन वर्षात १०० अमृत भारत ट्रेन, ५० नमो भारत ट्रेन आणि २०० वंदे भारत ट्रेन तयार करण्यात येणार आहेत. या अर्थसंकल्पात महाराष्ट्रातील रेल्वे विस्तार, रेल्वे विकासासाठी महत्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे.

महाराष्ट्राला सर्वाधिक २३ हजार ७७८ कोटी रुपयांचा निधी दिला आहे. यामुळे राज्यातील रेल्वेला गती मिळेल. शत प्रतिशत रेल विद्युतीकरण प्राप्त करणारे महाराष्ट्र प्रमुख राज्य आहे. यामुळे विजेची बचत होते. पर्यावरणाचे संरक्षण होत आहे. २०१४ पासून आतापर्यंत २ हजार १०५ किलोमीटर नवीन रेल्वे मार्ग विकसित करण्यात आले आहेत. महाराष्ट्रातील १३२ रेल्वे स्थानकांचा अमृत भारत स्थानक योजनेअंतर्गत विकास केला जात आहे.

  • मावळ लोकसभा मतदारसंघातील चिंचवड, आकुर्डी, तळेगाव दाभाडे, लोणावळा, पनवेल जंक्शनचा या योजनेअंतर्गत विकास केला जात आहे. कर्जत आणि नेरळ रेल्वे स्थानकाचा या योजनेत समावेश करावा. हा मार्ग मुंबईपासून पुण्यापर्यंत जातो. या मार्गावरून सर्वाधिक प्रवासी प्रवास करतात. त्यामुळे या योजनेत सहभागी करून घेऊन विकसित करावा. जेणेकरून प्रवाशांना सुविधा मिळतील. रेल्वे मार्गिकेच्या निर्माणासाठी ५० ते ६० टक्के किलोमीटर वाढवून १८३ किलोमीटर केले आहे. २०१४ पासून आतापर्यंत ४० हजार किलोमीटर अधिक रेल्वे लाइनचे विद्युतीकरण केले आहे. सौर, पवन ऊर्जाच्या माध्यमातून रेल्वे विजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण केली जात आहे.

तिसऱ्या आणि चौथ्या मार्गिकेसाठी जागेचे भूसंपादन करा
अर्थसंकल्पात घोषणा केली जाते. परंतु, प्रत्यक्षात वर्षानुवर्षे काम होत नाही. जागेचे भूसंपादन होत नाही. राज्य सरकारचा प्रतिसाद मिळत नाही. मावळ लोकसभा मतदारसंघात २०१७ मध्ये तिसऱ्या आणि चौथ्या मार्गिकेची घोषणा केली होती. केंद्र सरकारने मंजुरी दिली. अर्थसंकल्पात त्याचा उल्लेखही केला होता. परंतु, जमीन अधिग्रहण व अन्य कारणांमुळे अद्यापही तिसरा आणि चौथा मार्ग रखडला आहे.

मुंबईवरून पुण्याला जाणारा, सर्वाधिक वाहतूक असलेला हा मार्ग आहे. हा मार्ग झाल्यास प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल. पुणे ते लोणावळा दरम्यान लोकल ट्रेन धावते. कोरोना काळात दुपारच्या वेळेत रेल्वे बंद केली होती. याबाबत अनेकदा पाठपुरावा करून बारा वाजता ट्रेन चालू केली. परंतु, दुपारी दीड वाजताची लोकल ट्रेन बंद असल्याने कामगार, महिला, विद्यार्थी विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे दीड वाजता लोणावळावरून पुण्याला जाणारी लोकल पुन्हा सुरू करावी, असेही खासदार बारणे म्हणाले.

कर्जत ते लोणावळा आणि लोणावळा ते पुण्यापर्यंत तिसरी, चौथी मार्गिका करा
पनवेल आणि कर्जतच्या दरम्यान नवीन रेल्वे मार्ग बनत आहे. हा मार्ग लवकरच पूर्ण होईल. पनवेलमध्ये देशातील सर्वात मोठे विमानतळ होत आहे. त्यामुळे कर्जत ते लोणावळा आणि लोणावळा ते पुण्यापर्यंत तिसऱ्या आणि चौथ्या मार्गिकेचे काम करावे. त्यामुळे पनवेल पासून थेट पुण्यापर्यंत जलद ट्रेन धावू शकतात. त्यामुळे विमानतळावर येणाऱ्या नागरिकांसह मुंबई, पनवेल, पुणे दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना सुविधा निर्माण होईल. पनवेल ते मुंबई दरम्यान लोकल ट्रेन धावत आहे. दीड लाख दररोज प्रवास करतात.

सिडकोने बनविलेल्या रेल्वे स्थानकावर सुविधांचा अभाव आहे. रेल्वे विभागाने सिडकोसे चर्चा करून सुविधा निर्माण कराव्यात. माथेरानमध्ये नेरळपासून ट्रॉयट्रेन धावत आहे. पूर्वी दोन तासात जाणाऱ्या या ट्रेनला आता तीन तास लागत आहेत. येथे वर्षाला दहा लाख पर्यटक येतात. परंतु, एकच ट्रॉयट्रेन आहे. ट्रॉयट्रेनची संख्या वाढवावी. देशात पहिल्यांदाच विमानतळाप्रमाणे रेल्वे स्थानकावर सुविधा दिल्या जात आहेत. प्रत्येक रेल्वे स्थानक मॉडेल बनविण्याचे काम रेल्वे विभागाने केले आहे. प्लँटफॉर्मवर सुविधा दिल्या जात आहेत. रेल्वे स्थानकावर क्रांतिकारकांची माहिती द्यावी. प्रवाशांना इतिहासाची माहिती मिळेल. कोरोना काळात बंद केलेल्या ट्रेन, थांबे, चालू करावे तिकीट दरातील ज्येष्ठ नाहरिकांची सवलत योजना पुन्हा चालू करावी, अशी मागणी खासदार बारणे यांनी केली.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– भंडारा डोंगरावरील मंदिराच्या उभारणीसाठी शासन सर्वतोपरी मदत करेल ; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
– तुकाराम..तुकाराम.. नाम घेता कापे यम । लाखो भाविकांच्या उपस्थितीत संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांचा बीज सोहळा संपन्न
– पुणे, पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतूक कोंडीवर उपाय, रिंग रोड बाबत महत्वाची माहिती ; ‘या’ 13 गावात भूसंपादनाला वेग


dainik maval jahirat

Previous Post

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या तळेगाव दाभाडे येथील निवासस्थानाच्या नूतनीकरणासाठी मदत करणार – कुणाल राऊत

Next Post

PM Kisan APK file तुम्हालाही व्हॉट्सअपवर असा मेसेज आलाय का? मग ही बातमी नक्की वाचा

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Appeal not to download unknown APK files or links to avoid fraud under PM-KISAN scheme

PM Kisan APK file तुम्हालाही व्हॉट्सअपवर असा मेसेज आलाय का? मग ही बातमी नक्की वाचा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Pawana Dam Water storage stands at 90 percent heavy rainfall continues in dam catchment area

पवना धरणाची शंभरीकडे वेगाने वाटचाल ! आजअखेर ९० टक्के पाणीसाठा, धरणक्षेत्रात मुसळधार पाऊस सुरूच

July 22, 2026
Kamshet-Nane route is in deplorable condition maval

कामशेत – नाणे मार्गाची जागोजागी प्रचंड दूरवस्था ; प्रवासी, पर्यटक, स्थानिकांना करावा लागतोय धोकादायक प्रवास

July 22, 2026
NDRF to have a permanent base in Maval approval to allot three hectares of land at Sadumbre to NDRF

मावळमध्ये असणार ‘एनडीआरएफ’चा कायमस्वरुपी तळ ; NDRF ला सदुंबरे येथे तीन हेक्टर जमीन देण्यास मान्यता

July 22, 2026
Lonavala world-famous Lonavala Chikki receives GI Tag century-old tradition gains global recognition

लोणावळा येथील जगप्रसिद्ध “लोणावळा चिक्की”ला ‘जीआय टॅग’ ; शतकभराच्या परंपरेला मिळाली जागतिक ओळख

July 20, 2026
Tourist-Places-Maval-Taluka

रिमझिम पावसाने मावळचा निसर्ग फुलला ; निर्बंध हटल्यामुळे पवना, लोणावळा परिसरात पर्यटकांची तोबा गर्दी

July 20, 2026
Agony even after death corpse suffers indignity due to lack of cremation ground in Maval Ardav village

मरणानंतरही नशिबी यातनाच ; मावळच्या आर्डव गावात स्मशानभूमी अभावी मृतदेहाची हेळसांड

July 18, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.