Dainik Maval News : तळेगाव दाभाडे येथे महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या पुढाकारातून स्थापन झालेली राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्था फलोत्पादनासह विविध शेती विषयक प्रशिक्षणासाठी 50 एकर जागेवर कार्यरत आहे. या संस्थेच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचे मागील सहा महिन्यांपासून वेतन, भत्त्यांसह अन्य आर्थिक लाभ थकित आहेत.
यामुळे कर्मचाऱ्यांची उपासमार होण्याची शक्यता निर्माण झाली असल्यामुळे सोमवारी (दि.17) पासून सुधीर वाघ सहाय्यक व्यवस्थापक प्रकल्प यांनी सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांच्या मागण्यांसाठी बेमुदत उपोषण सुरू केले आहे. सदर उपोषणास सर्व अधिकारी,कर्मचारी आणि कंत्राटी कामगार यांनी पाठिंबा दर्शविलेला आहे.
संस्थेतील अधिकारी कर्मचारी यांचे गेले सहा महिने वेतन भत्ते व इतर आर्थिक लाभ प्रलंबित असल्यामुळे आर्थिक दृष्ट्या संकटात सापडले आहेत. यामुळे संस्थेचे कर्मचारी संचालक, सचिव व पणन मंत्री यांना वारंवार भेटून निवेदन देत आहेत व मार्ग काढण्यासाठी विनंती करत आहेत. मात्र गेले सहा महिने त्यावर कोणताही तोडगा वरिष्ठांकडून काढला जात नाही. केवळ आश्वासन दिले जात आहे. या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी संस्थेच्या कर्मचाऱ्यांनी आमरण उपोषण सुरु केले आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– अर्थसंकल्पात घोषणा होते, पण वर्षानुवर्षे काम होत नाही ; तिसऱ्या व चौथ्या रेल्वे ट्रॅकसाठी तातडीने भूसंपादन करा
– तळेगाव-चाकण-शिक्रापूर मार्गावरील अतिक्रमणे ‘पीएमआरडीए’च्या रडारवर ; कारवाईस प्रारंभ
– तळेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्याला लाच स्वीकारताना अटक ; एसीबीच्या पथकाची कारवाई