Dainik Maval News : पवन मावळ विभागातील शिळींब गावात शनिवारी दि.22) शिवराय फ्रेंड्स सर्कल या मित्र मंडळाच्या वतीने ‘छावा’ चित्रपटाचे मोफत प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवन चरित्रावर आधारित ‘छावा’ हा चित्रपट सध्या गाजत आहे. चित्रपटामुळे छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास सर्वांपर्यंत पोहचत आहे.
- शिळींब सारख्या दुर्गम भागातील नागरिकांना चित्रपटगृहात जाऊन सिनेमा पाहणे शक्य होत नाही, त्यामुळे शिवराय फ्रेंड्स सर्कलच्या सदस्यांनी ग्रामस्थांसाठी गावातच छावा चित्रपट दाखविण्याचे ठरविले. यानिमित्ताने गावात प्रथमच मोठ्या स्क्रीनवर ग्रामस्थांनी सिनेमा पाहिला.
छावा सिनेमा पाहायला पंचक्रोशीतील नागरिकांनी गर्दी केली होती. सर्वांनी स्तुत्य उपक्रमाबद्दल मंडळाचे आभार मानले व छत्रपती संभाजी महाराजांच्या कार्याला वंदन केले. मंडळाचे सदस्य सचिन बिडकर, रोहित केदारी, शिवाजी कुंभार आदींनी यासाठी विशेष प्रयत्न केले.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– संत तुकाराम साखर कारखाना निवडणूक : नेतृत्व कायम, पण संचालक मंडळात मोठ्या बदलांचे संकेत । Sant Tukaram Sugar Factory Election
– सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करणाऱ्यावर गुन्हा दाखल ; लोणावळा पोलिसांकडून शांतता व सामाजिक सलोखा राखण्याचे आवाहन
– पुणे ग्रामीण जिल्ह्यात 4 एप्रिलपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू, वाचा नियमावली । Pune News