Dainik Maval News : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या कार्ला येथील आई एकविरा देवीच्या चैत्री यात्रेला गुढीपाडव्यापासून सुरूवात झाली आहे. गुरुवारी (दि.3 एप्रिल) षष्टीला देवीचे माहेरघर असलेल्या देवघर येथे पारंपारिक नृत्य व वाद्याच्या गजरात देवीचे बंधू काळभैरवनाथ महाराजांचा पालखी सोहळा संपन्न झाला.
हजारोंच्या संख्येने कोळी बांधव या मिरवणूकीत सहभागी झाले होते. श्री काळभैरवनाथ ट्रस्टचा वतीने सकाळी काळभैरवनाथ मंदिरात अभिषेक करीत मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आले. पालखी सोहळ्यानिमित्त श्री काळभैरवनाथ मंदिर, गाभारा आकर्षक फुलांनी सजविण्यात आला होता. देवघर येथील श्री काळभैरवनाथ ट्रस्ट, बांधकाम समिती देवघर आणि देवघर ग्रामस्थ यांच्या वतीने सोहळ्याचे संयोजन करण्यात आले होते.
दरम्यान पालखी सोहळा प्रसंगी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी लोणावळा ग्रामीण पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस व ग्राम सुरक्षा दलाच्या सदस्यांच्या वतीने चोख बंदोबस्त तैणात करण्यात आला होता.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– साखर कारखान्याच्या माध्यमातून तालुक्याचा विकास व्हावा ; शेतकऱ्यांच्या उसाला चांगला दर मिळावा – आमदार सुनिल शेळके
– मावळ तालुक्यातील इंदुरी येथील भुईकोट किल्ल्यावर 61 फुटी भगव्या ध्वजाचे लोकार्पण । Maval News
– मोठी बातमी : श्री संत तुकाराम महाराज संस्थानच्या अध्यक्षपदी जालिंदर मोरे यांची निवड ; चुरशीची लढतीत 63 मतांनी विजयी । Dehu News


