व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, July 30, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

साखर कारखान्याच्या माध्यमातून तालुक्याचा विकास व्हावा ; शेतकऱ्यांच्या उसाला चांगला दर मिळावा – आमदार सुनिल शेळके

कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष विदुरा नवले यांच्यासह पॅनेलच्या उर्वरित तिन्ही उमेदवारांना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्याचे निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
April 2, 2025
in लोकल, ग्रामीण, मावळकट्टा, शहर
maval taluka should be developed through Sant Tukaram Sugar Factory said MLA Sunil Shelke

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : “संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून तालुक्याचा सर्वांगीण विकास घडविण्यासाठी प्रयत्नशील राहू. शेतकऱ्यांना अधिक चांगला ऊस दर मिळावा, पारदर्शक कारभार व्हावा, तसेच कारखान्याच्या माध्यमातून शैक्षणिक आणि औद्योगिक प्रगती साधावी,” असे प्रतिपादन आमदार सुनील शेळके यांनी केले.

श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याच्या सार्वत्रिक निवडणूक प्रचारार्थ आयोजित महायुती मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी बिनविरोध निवड झालेल्या संचालकांचा सत्कार करण्यात आला. वडगाव मावळ शासकीय विश्रामगृहाच्या आवारात महायुतीच्या वतीने आयोजित या मेळाव्यात राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, शिवसेना, आरपीआय, स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष व मित्रपक्षांचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

  • कार्यक्रमाला आमदार सुनील शेळके, आरपीआय नेते सूर्यकांत वाघमारे, भाजपचे ज्येष्ठ नेते भास्करराव म्हाळसकर, स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रमेश साळवे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे, शिवसेना तालुकाप्रमुख राजू खांडभोर विठ्ठल शिंदे, सुरेश चौधरी, संतोष दाभाडे, भरत येवले, दीपक हुलावळे, कृष्णा कारके, नारायण ठाकर, बाबूलाल नालबंद, शरद हुलावळे, अरुण लाड, विलास बडेकर, बबनराव ओव्हाळ, देविदास कडू, महादूबुवा कालेकर, रामनाथ वारिंगे, सुनील ढोरे, नामदेव घुले, काळूराम मालपोटे, मारुती देशमुख, दिपाली गराडे, माऊली ठाकर, तुकाराम आसवले, संभाजी शिंदे, राजू चव्हाण, उमा मेहता, आरोही तळेगावकर उपस्थित होते.

याप्रसंगी कारखान्याच्या संचालकपदी बिनविरोध निवड झालेल्या माऊली दाभाडे, हभप छबन महाराज कडू, लक्ष्मण भालेराव, उमेश बोडके, भरत लिम्हण, संदीप काशीद, शोभाताई वाघोले यांचा विशेष सत्कार करण्यात आला. याशिवाय निवडणुकीतील उमेदवार चेतन भुजबळ यांनाही शुभेच्छा देण्यात आल्या. आमदार शेळके यांच्या रोजगार हमी योजना समितीच्या प्रमुखपदाच्या निवडीबद्दल त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

  • आमदार सुनील शेळके यांनी पॅनलच्या विजयासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावल्याचे सांगत, “महायुती सरकारच्या पाठिंब्याने हा पॅनल निवडून आला आहे. शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून पारदर्शक कारभार करा. खर्च न करता संचालक झालात, त्यामुळे अधिक जबाबदारीने काम करा,” असे ते म्हणाले.

“आपल्याकडे पुढारी कमी आणि पदे जास्त आहेत. त्यामुळे शासकीय समित्या व अन्य पदांवर सर्वांना संधी मिळेल. पुरुषांप्रमाणेच महिलांनाही योग्य सन्मान मिळेल,” अशी ग्वाही आमदार शेळके यांनी दिली.

यावेळी त्यांनी जातीपातीवर आधारित राजकारण टाळण्याचे आवाहन केले. “विकासासाठी सर्वांना सोबत घेऊन पुढे जावे लागेल. पुरुषांप्रमाणेच महिलांनाही सन्मान मिळेल,” असे ते म्हणाले. शेवटी त्यांनी, “वेळ पडल्यास लोकहितासाठी मोर्चा काढावा लागला तरी मागे हटणार नाही,” असा निर्धार व्यक्त केला.

  • कार्यक्रमाच्या प्रारंभी गणेश खांडगे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख राजू खांडभोर यांनी शिवसेना कार्यकर्त्यांना अधिक संधी मिळावी, अशी मागणी केली. रमेश साळवे यांनी मावळ तालुक्याला भविष्यात मंत्रिपद मिळावे, अशी इच्छा व्यक्त केली. भास्करराव म्हाळसकर यांनी तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यावर भर दिला.

सूर्यकांत वाघमारे यांनी कारखान्याच्या माध्यमातून मेडिकल व इंजिनिअरिंग कॉलेज स्थापन करून तालुक्याच्या प्रगतीस चालना द्यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. माऊली दाभाडे यांनी शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवून सुविधा पुरविल्या जातील, असे सांगितले.

कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष विदुरा नवले यांच्यासह पॅनेलच्या उर्वरित तिन्ही उमेदवारांना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्याचे निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– राज्यातील 560 गोशाळांच्या बँक खात्यात 25 कोटी 44 लाखांचे अनुदान जमा ; तुमची गोशाळा असल्यास ‘असा’ मिळवा योजनेचा लाभ
– दिलासादायक ! राज्यातील 64 लाख शेतकऱ्यांना मिळणार 2 हजार 555 कोटींची विमा नुकसान भरपाई
– राज्यातील महामार्गांवर प्रत्येक 25 किलोमीटर अंतरावर महिलांसाठी सुसज्ज स्वच्छतागृह बांधणार – मंत्री आदिती तटकरे
– तळेगाव शहरातील वाहतुकीत मोठा बदल ; श्री डोळसनाथ महाराज वार्षिक उत्सवाच्या पार्श्वभूमीवर निर्णय । Talegaon Dabhade 


dainik maval jahirat

Previous Post

मोठी बातमी : मावळ तालुक्यातील कान्हे गाव हद्दीत 22 वर्षीय तरूणाची हत्या । Maval Crime

Next Post

किराणा साहित्य आणायला गेलेल्या दुचारीस्वार तरूणाचा मृत्यू ; तळेगाव येथील घटना । Talegaon Dabhade

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Accident

किराणा साहित्य आणायला गेलेल्या दुचारीस्वार तरूणाचा मृत्यू ; तळेगाव येथील घटना । Talegaon Dabhade

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Lonavala residents public outcry against Tata highway blocked demanding compensation for flood damages

टाटा कंपनीविरोधात लोणावळाकरांचा जनआक्रोश, महामार्ग रोखला ; पुरामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई मिळण्यासाठी आंदोलन

July 29, 2026
Laptops distributed to Assistant Agriculture Officers by Deputy Chief Minister Sunetra Pawar

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते सहाय्यक कृषी अधिकाऱ्यांना लॅपटॉपचे वाटप; मावळमधील ४५ अधिकाऱ्यांना लॅपटॉप

July 29, 2026
Car overturns into field after road collapses at Kale-Pavananagar no remedial measures taken after accident

काले-पवनानगर येथे रस्ता खचल्याने कार शेतात उलटली, सुदैवाने जिवितहानी टळली; अपघाताच्या चार दिवसांनंतरही उपाययोजना शून्य

July 28, 2026
Rice-Cultivated-Maval

Rice Farming in Maval Taluka : ‘गेले ते दिवस, राहिल्या फक्त आठवणी’ … मावळ तालुक्यात भातशेतीचं स्वरुप प्रचंड बदललं

July 28, 2026
SRT

SRT Rice Technique : ‘एसआरटी’ म्हणजे नक्की काय रे भाऊ ? भात लागवडीची ही पद्धत का होतेय शेतकऱ्यांच्या पसंतीची, जाणून घ्या

July 28, 2026
Momentum for Nigdi-Chakan Metro Line Project Plan Presented mp shrirang barne mla sunil shelke

किवळे- रावेत- डांगे चौक- काळेवाडी- जगताप डेअरी ते चतु:श्रृंगी मेट्रो मार्गाचा ‘डीपीआर’ तयार करण्याची सूचना

July 28, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.