Dainik Maval News : कोरोना काळात डिटेन केलेली तसेच अपघातातील बेवारस वाहने संबंधित वाहन मालकांनी कागदपत्रांची पुर्तता करून घेऊन जाण्याचे आवाहन वडगाव मावळ पोलिसांनी केले आहे. याबाबत पत्रक प्रसिद्ध करून वडगाव पोलिसांनी वाहनांची यादी प्रसिद्ध केली आहे.
कोरोना काळात डिटेन केलेली आणि अपघातातील बेवारस वाहने पोलीस स्टेशनच्या परिसरात पडून आहेत. ह्या वाहनांच्या मुद्देमाल निर्गती मोहिमेअंतर्गत विल्हेवाट लावण्यासाठी वाहनांच्या मालकांनी आपल्या वाहनाचे आरसी बूक व आधार कार्ट घेऊन पोलीस ठाण्यात संपर्क करायचा आहे, याबाबत वडगाव मावळ पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक कुमार कदम यांच्यामार्फत जाहीर आवाहन करण्यात आले आहे.
वडगाव मावळ ठाण्याकडे अशी 25 दुचाकी व एक चारचाकी वाहन आहे. जर सात दिवसांत संबंधित वाहनांचे मालक यांनी पोलीस ठाण्याशी संपर्क केला नाही, तर वाहन मालक वाहनाचा ताबा घेण्यास इच्छुक नाही असे समजून त्या वाहनाचा कायदेशीर लिलाव करण्यात येईल, असेही सांगण्यात आले आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– महत्वाची बातमी : पुणे – लोणावळा रेल्वे मार्गावर 3 दिवसांचा ब्लॉक, लोकलसह एक्स्प्रेस गाड्यांच्या वेळापत्रकात बदल । mega block on central railway
– आयपीएस सत्यसाई कार्तिक यांच्या बदलीच्या एक महिन्यानंतरही उपविभागीय पोलीस अधिकाऱ्याची खूर्ची रिकामीच । Lonavala News
– पर्यटनासाठी येताय? मग 9850112400 हा नंबर सेव्ह करून ठेवा ; लोणावळा पोलिसांकडून पर्यटकांसाठी हेल्पलाइन नंबर सुरू । Lonavala Tourist Helpline Number