Dainik Maval News : मावळ तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत ताजे – पिंपळोली – पाथरगाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी रेश्मा गणेश गायकवाड यांची निवड करण्यात आली आहे. विद्यमान सरपंच ताईबाई हिरामण केदारी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत ही निवडप्रक्रिया पार पडली. यावेळी गायकवाड यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची अविरोध निवड जाहीर करण्यात आली. निवडणूक अधिकारी म्हणून ग्रामसेविका नूतन अमोलिका यांनी काम पाहिले.
याप्रसंगी माजी उपसरपंच पिंकी बालगुडे, माजी सरपंच नीलम सुतार, माजी उपसरपंच सचिन केदारी, माजी उपसरपंच सिद्धार्थ चौरे, विकास केदारी, उपस्थित होते. तसेच पिंपळोली ग्रामस्थ बाळू गायकवाड, सुभाष गायकवाड, दगडू लोखंडे, बाळासाहेब पिंपळे चिंधु तावरे, लक्ष्मण पिंपळे, काळू तावरे, अविनाश केदारी, भरत गायकवाड बबन तावरे, संतोष केदारी, हनुमंत गायके, संतोष बोंबले संदीप चौरे, सोमनाथ बांगर, सुभाष केदारी, रोहिदास मिंडे, अंतू बोंबले, तानाजी बोंबले, हिरामण केदारी, विष्णू बोंबले, पप्पू गायकवाड, गणेश बोंबले, सोमनाथ शिर्के, एकनाथ शिंदे, दीपक गुजर उपस्थित होते.
उपसरपंचपदी निवड झाल्यानंतर ग्रामपंचायत व उपस्थित ग्रामस्थ यांच्या वतीने रेश्मा गायकवाड यांचा सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना नवनिर्वाचित उपसरपंच रेश्मा गायकवाड यांनी, गावचा सर्वांगीण विकास करण्याचा व सर्व घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न करेन, असे सांगितले.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– महत्वाची बातमी : पुणे – लोणावळा रेल्वे मार्गावर 3 दिवसांचा ब्लॉक, लोकलसह एक्स्प्रेस गाड्यांच्या वेळापत्रकात बदल । mega block on central railway
– आयपीएस सत्यसाई कार्तिक यांच्या बदलीच्या एक महिन्यानंतरही उपविभागीय पोलीस अधिकाऱ्याची खूर्ची रिकामीच । Lonavala News
– पर्यटनासाठी येताय? मग 9850112400 हा नंबर सेव्ह करून ठेवा ; लोणावळा पोलिसांकडून पर्यटकांसाठी हेल्पलाइन नंबर सुरू । Lonavala Tourist Helpline Number
