Dainik Maval News : बारा मावळातील भोर व मावळ येथील 11 मावळ्यांनी एकाच दिवसात बारा तासात सात किल्ल्यांवर चढाई करत एक अनोखा विक्रम केला आहे. या विक्रमाची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद करण्यात आली. सदर चढाईमध्ये सहभागी झालेल्या मावळ्यांचा प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला आहे.
महाराष्ट्रातील गड किल्ले हे शिवरायांच्या स्वराज्याचा अनमोल ठेवा आहे. शेकडो वर्ष होऊन गेले तरी हे गड किल्ले आजदेखील शिवरायांच्या आणि त्यांच्या मावळ्यांच्या पराक्रमाची साक्ष देत उभे आहेत. आणि या गडकिल्ल्यांवरती चढाई करण्याची प्रेरणा येथील भटक्यांना देत असतात. शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या गडकिल्ल्यांवरती भेट देणे हे प्रत्येक शिवप्रेमीचे स्वप्न असते. अशाच काही ध्येयवेड्या गडकोटप्रेमी युवकांनी एकत्र येत मावळातील तब्बल सात किल्ल्यांवर यशस्वीपणे चढाई करून बारा तासांमध्ये हा विक्रम 18 जानेवारी रोजी केला होता.
- ग्रुपने आपली सुरुवात सकाळी पाच वाजता राजमाची या किल्ल्याच्या मनरंजन या बालेकिल्ल्यापासून केली. यानंतर श्रीवर्धन हा किल्ला सर केला. यानंतर हा गट राजमाचीपासून खासगी वाहणारे प्रवास करून लोहगड, विसापूरकडे रवाना झाला. या जोडगोळीतील पहिला विसापूर किल्ला या गटाने सर केला. यानंतर लोहगडावर आपली पावले ठेवली. लगेचच गड उतार होऊन मंडळी तिकोना गडाकडे रवाना झाली.
तिकोना गड तासाभरात सर करून मावळे तुंग गडाकडे रवाना झाले. आणि तुंग गड तासाभरामध्येच चढाई करून उतरलेदेखील यानंतर आता वेळ होती कोराईगड पार करणे आणि सहा गड पार करणे आणि ते पार करून सातवा कोराईगड चढाई करणे आणि उतरणे हे एक आव्हानच होते, पण या गटाने हे आव्हानदेखील पार करून एका नव्या विक्रमाला गवसणी घातली आहे.
अकरा मावळे
सुनील चंद्रकांत शेडगे, शेखर शांताराम नाणेकर, रुपेश हरिभाऊ कुंभार, राजेंद्र महादेव चौगुले, लतिफ बापू पटेल, मनोज लक्ष्मण जगताप, रामेश्वर खांडेभराड, बबन कदम, राजेंद्र शिंदे, वसंत विठ्ठल कामथे, अनंता भागवत यांनी हे किल्ले बारा तासात सर केले.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– ‘पवना कृषक’वर भाजपाची सत्ता ! सर्वपक्षीय नेत्यांच्या राजकारणाला अपयश, सिनेमाला लाजवेल अशा घडामोडी, वाचा सविस्तर
– दिव्यांग नागरिकांना हक्काचा निवारा मिळावा यासाठी राज्य शासन स्वतंत्र घरकुल योजना तयार करणार
– पवना नदी परिसरातील बेकायदेशीर बांधकामावर अतिक्रमणविरोधी कारवाईचा हातोडा ! Pavana Dam Updates