Dainik Maval News : दुचाकी लावल्याच्या कारणावरून युवकाला व त्याच्या आईला नात्यातीलच व्यक्तींनी मारहाण केल्याची घटना चांदखेड येथे घडली आहे. याप्रकरणी तेजस राजेंद्र गरूड (वय २३ वर्षे, रा. न्यू इंग्लिश स्कूल शाळेजवळ, चांदखेड) यांनी शिरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
त्यानुसार पोलिसांनी आरोपी अशोक बाळा गायकवाड (वय अंदाजे ६५ वर्षे, रा. चांदखेड), महेश अशोक गायकवाड (वय अंदाजे ३४ वर्षे, रा चांदखेड) आणि गौरव ज्ञानोबा गायकवाड (वय २० वर्षे रा चांदखेड) यांच्यावर भारतीय न्याय संहिता कलम ११७ (२), ११५ (२), ३५२, ३५१ (२), ३ (५) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
बुधवार दिनांक ९ एप्रिल रोजी सायंकाळी पाऊणेसातच्या सुमारास मौजे चांदखेड (ता. मावळ) येथे हा प्रकार घडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्यांच्या मामाचे शेतात जात असताना शेताजवळ असलेल्या देवळा शेजारी दुचाकी लावल्याचे कारणावरून फिर्यादीच्या आईचे नातलग आरोपी अशोक गायकवाड, महेश गायकवाड आणि गौरव गायकवाड यांनी संगनमत करून फिर्यादीला व फिर्यादीच्या आईला शिवीगाळ दमदाटी करीत हाताने लाथाबुक्याने मारहाण केली. यात फिर्यादीची आई जखमी झाली, असे फिर्यादीत नमूद आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– 25 पेक्षा जास्त वाहन मालकांची मागणी आल्यास जागेवरच फिटमेंट शुल्काशिवाय ‘एचएसआरपी’ बसवून मिळणार
– राज ठाकरेंनी भाकरी फिरवली ; मावळ तालुका मनसेत मोठे फेरबदल, तालुकाध्यक्षपदी अशोक कुटे यांची निवड । Maval News
– स्वबळावर लढण्याची तयारी हवी ; कामशेत येथील मेळाव्यात रामदास आठवले यांचे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन । Kamshet News
– वन्यजीव रक्षकांच्या प्रयत्नांना यश, कासवांच्या पिल्लांनी पाहिले जग । Maval News