Dainik Maval News : सह्याद्री विद्यार्थी अकादमी मावळ यांच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंती निमित्त एक कौतुकास्पद उपक्रम राबविण्यात आला. डॉ. आंबेडकर जयंती निमित्त वाडीवळे येथील वीटभट्टी कामगारांच्या लहान मुलांना खाऊ वाटप आणि शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. तसेच येथील शाळेला बोर्ड, सतरंजी साहित्य भेट देऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले.
डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर लहान मुलांना खाऊ वाटप करण्यात आला. तसेच वीटभट्टीवरील कामगारांच्या मुलांना व पालकांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक केदार डाकवे, चेतन वाघमारे यांनी केले. आभार रुपाली कटके यांनी मानले. यावेळी सहदेव केदारी, तेजस वाघवले, सचिन शेडगे, अनिश शर्मा, अंकुश काटकर, सचिन गायकवाड, किशोर वाघमारे, निकिलेश दौंडे, प्रसन्न पार्टे, अमोल तिकोने, लक्ष्मण शेलार, बाळासाहेब जमादार, वैभव हजारे उपस्थित होते.
यावेळी सह्यादी विद्यार्थी अकादमीचे सहदेव केदारी, तेजस वाघवले, सचिन शेडगे, अनिश शर्मा, अंकुश काटकर, सचिन गायकवाड, किशोर वाघमारे, निकिलेश दौंडे, प्रसन्न पार्टे, अमोल तिकोने, लक्ष्मण शेलार, बाळासाहेब जमादार, वैभव हजारे आदी उपस्थित होते. ( Sahyadri Vidyarthi Academy Maval celebrates Dr Babasaheb Ambedkar birth anniversary )
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– अमृत भारत स्टेशन योजनेंतर्गत महाराष्ट्रातील 132 रेल्वे स्थानकांचा होणार कायापालट ; पाहा रेल्वे स्थानकांची यादी व मंजूर निधी
– सोमाटणे फाटा येथील कोंडी सोडविण्यासाठी पीएमआरडीएच्या जागेत रस्त्यांचे रुंदीकरण करावे – खासदार श्रीरंग बारणे
– ना दाखला ना कुठली सेवा मिळणार ; थकबाकीदारांवर वडगाव नगरपंचायत करणार कठोर कारवाई । Vadgaon Maval