व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, May 12, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

ना दाखला ना कुठली सेवा मिळणार ; थकबाकीदारांवर वडगाव नगरपंचायत करणार कठोर कारवाई । Vadgaon Maval

वडगाव शहरात लहान, मोठे असे मिळून अंदाजे 100 अपार्टमेंट असून काही अपार्टमेंट मधील सदनिकामध्ये कोणीही राहत नसल्यामुळे कर वसुली करणे शक्य होत नाही.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
April 12, 2025
in लोकल, शहर
Vadgaon-Nagar-Panchayat

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : वडगाव नगर पंचायतीची वर्ष सन 2024-25 या वर्षातील घरपट्टी कराची चालू व थकीत एकूण मागणी 9 कोटी तसेच पाणीपट्टीची चालू व थकीत एकूण मागणी 1 कोटी 46 लाख अशी दोन्ही मिळून एकूण मागणी 10 कोटी 46 लाख एवढी असून 31 मार्च 2025 अखेरीस नगरपंचायतीची एकुण वसुली 6 कोटी 15 लाख इतकी झाली असून एकूण 58 टक्के वसुली झाली आहे.

वडगाव शहरात लहान, मोठे असे मिळून अंदाजे 100 अपार्टमेंट असून काही अपार्टमेंट मधील सदनिकामध्ये कोणीही राहत नसल्यामुळे कर वसुली करणे शक्य होत नाही. परंतु आता ज्या सदनिकांची वर्षानुवर्षे थकबाकी आहे, त्या सदनिकांना जप्तीपूर्वीच्या नोटीस देण्यात आलेल्या आहेत व त्यांना तीन दिवसात कर भरुन घेण्याची मुदत देण्यात येत आहे. जर तीन दिवसात सदनिका धारकांनी कर भरला नाही तर महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम 1965 चे कलम 152 ते 156 नुसार मालमत्ता जप्त करण्यात येईल व लिलावाद्वारे विकुन कर जमा करुन घेण्यात येईल.

  • वडगाव नगरपंचायतीची चतुर्थ वार्षिक कर आकारणी करण्यापूर्वी वडगाव शहरातील ७८०० मिळकतींची नोंद होती व कराची चालू मागणी 3.20 कोटी होती. कर आकारणी पूर्ण झाल्यावर 12562 इतक्या मिळकतींचा सर्व्हे झाला व चालु कराची मागणी 5.63 कोटी एवढी वाढली. त्यामध्ये थकबाकी मिळुन सन 2024-25 वर्षाची एकुण 10.46 कोटी एवढी कराची मागणी झाली होती. मार्च महिन्यात कर वसुलीसाठी एकुण 5 पथके तयार केली होती. त्यामध्ये घरोघरी जाऊन कर भरण्यासाठी लोकांना प्रवृत्त करण्यात आले. सुमारे 127 नळ कनेक्शन कट करण्यात आले व ज्या मिळकतींची थकबाकी वर्षानुवर्ष होती अशा मिळकतींना सुमारे 47 जप्तीपुर्वीच्या नोटिस देण्यात आल्या होत्या.

डॉ. प्रविण निकम, मुख्याधिकारी तथा प्रशासक, वडगाव नगर पंचायत यांनी आवाहन केले आहे की, सदरील सदनिका धारकांनी लवकरात लवकर कर भरावा व कारवाई टाळावी तसेच अशा मालमत्ता धारकांना वडगांव नगरपंचायतीकडुन कोणतीही सेवा अथवा दाखले देण्यात येणार नाही. जप्तीपुर्वीच्या नोटीस दिल्यावर जर कर भरला नाही अशा सदनिकावर कारवाई करण्यात येणार आहे.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– ‘पवना कृषक’वर भाजपाची सत्ता ! सर्वपक्षीय नेत्यांच्या राजकारणाला अपयश, सिनेमाला लाजवेल अशा घडामोडी, वाचा सविस्तर
– दिव्यांग नागरिकांना हक्काचा निवारा मिळावा यासाठी राज्य शासन स्वतंत्र घरकुल योजना तयार करणार
– पवना नदी परिसरातील बेकायदेशीर बांधकामावर अतिक्रमणविरोधी कारवाईचा हातोडा ! Pavana Dam Updates


Previous Post

माणसं पैशाने मोठी असण्यापेक्षा कर्तृत्वाने मोठी असावी ; हभप निवृत्ती महाराज देशमुख यांचे प्रतिपादन । Vadgaon Maval

Next Post

‘महावाचन अभियान’ , महापुरुषांना अभिवादन करण्यासाठी मावळ पंचायत समितीचा नाविन्यपूर्ण उपक्रम । Maval News

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
read readers reading book books

'महावाचन अभियान' , महापुरुषांना अभिवादन करण्यासाठी मावळ पंचायत समितीचा नाविन्यपूर्ण उपक्रम । Maval News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Crime

अलिशान कारमधून गांजा घेऊन जात असलेल्या आरोपीस उर्से टोल प्लाझा येथून घेतले ताब्यात

May 11, 2026
Jail-And-Court

देहूरोड सामूहिक बलात्कार प्रकरण : चार नराधमांना दुहेरी जन्मठेपेची कठोर शिक्षा

May 11, 2026
woman died after falling from eighth floor incident at Katvi in ​​Vadgaon Maval area

Video : आठव्या मजल्यावरून पडल्याने एका महिलेचा मृत्यू, वडगाव मावळ परिसरातील कातवी येथील घटना

May 11, 2026
Neelam Gorhe held an administration meeting regarding rape of a minor girl in Pawana Dam area ​​Lonavala

लोणावळा ग्रामीण हद्दीत पवना डॅम परिसरात झालेल्या अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हेंनी घेतली प्रशासनाची बैठक

May 11, 2026
Sainath Varghade from Ardav Maval has passed 10th exam after 26 years by solving English subject

‘इंग्रजी’ भाषेवर जिद्दीने केली मात ! तब्बल २६ वर्षानंतर आर्डव गावचे ‘साईनाथभाऊ’ झाले दहावी पास

May 10, 2026
Bhumi Pujan of new building of Shri Dnyaneshwar Vidyaniketan School Ajivali Javan

आजिवली येथील श्री ज्ञानेश्वर विद्यानिकेतन शाळेच्या नूतन इमारतीचा भूमिपूजन सोहळा उत्साहात संपन्न

May 10, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.