व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Friday, April 17, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

माणसं पैशाने मोठी असण्यापेक्षा कर्तृत्वाने मोठी असावी ; हभप निवृत्ती महाराज देशमुख यांचे प्रतिपादन । Vadgaon Maval

वडगाव मावळ येथील श्री पोटोबा देवस्थानचे मुख्य विश्वस्त व माजी सरपंच दिवंगत सोपानराव म्हाळसकर यांच्या प्रथम स्मृती दिनानिमित्त आयोजित केलेल्या कीर्तनसेवेप्रसंगी ते बोलत होते.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
April 12, 2025
in लोकल, शहर
Kirtan of Nivruti Maharaj Indurikar concluded at Vadgaon Maval

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : माणसे पैशाने मोठी असण्यापेक्षा कर्तुत्वाने मोठी असावी. आयुष्यात चांगले वागा, शेवटी हिशोब देऊन जायचे आहे. असे प्रतिपादन समाज प्रबोधनकार हभप निवृत्ती महाराज देशमुख (इंदुरीकर) यांनी मावळवासियांना केले.

वडगाव मावळ येथील श्री पोटोबा देवस्थानचे मुख्य विश्वस्त व माजी सरपंच दिवंगत सोपानराव म्हाळसकर यांच्या प्रथम स्मृती दिनानिमित्त आयोजित केलेल्या कीर्तनसेवेप्रसंगी ते बोलत होते. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर व पंचक्रोशीतील वारकरी, ग्रामस्थ, महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

याप्रसंगी वैराग्य मूर्ती हभप शंकर महाराज मराठे, हभप पंकज महाराज गावडे, श्रीक्षेत्र भंडारा डोंगर ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब काशीद, हभप तुषार महाराज दळवी यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

  • ह.भ.प. देशमुख महाराज म्हणाले, की,संत हे वारकरी संप्रदायाचे प्राण आहेत.संतांच्या विचाराशिवाय कलियुगातील मनुष्य जगू शकत नाही.अभ्यासापेक्षा ज्ञान श्रेष्ठ असते. आणि ज्ञानापेक्षा देवाचे ध्यान श्रेष्ठ आहे.कर्म हाच देव आहे असे सांगत आत्मा एकच आहे आणि तो नित्य आहे. मरताना चैतन्य जाते, देह जात नाही,शरीर जात नाही आणि आत्माही जात नाही. मात्र; चैतन्य गेल्याशिवाय राहत नाही, त्यामुळे स्वर्ग,नरक करीत राहू नका, फक्त भजन करीत रहा ! असे आवाहन हभप देशमुख महाराजांनी यावेळी केले.

अंगातील ताकद आणि खिशातील पैसा संपला की, तुमचे सर्व संपते, सत्तेच्या,पैशाच्या व दडपशाहीच्या जोरावर माणसे काहीही करू शकतात, मात्र, काळ आणि मृत्यू या दोन्हीच्या विरोधात जगातील कोणीच काही करू शकत नाही. नाही वशिला चालत, अन नाही पैसाही चालत. तसेच प्रत्येकाचाच काळ असतो. या विश्वातील पहिली क्रांती तुकाराम महाराजांचे ‘ वैकुंठ गमन ‘ होय! तोही काळ आहे. दमयंती- नळ राजा, हाही काळ आहे. काळाच्या विरोधात वागू नका असेही देशमुख महाराज यावेळी म्हणाले.

  • माणसांवर संकट नाही, धर्मावर संकट आहे. विकास आणि धर्म या गोष्टी एकत्र आल्या पाहिजे. आता माणसे बाहेरून श्रीमंत झाली आहेत. आणि आतून दुबळी झाली आहेत. अर्थात माणसे बाह्य जीवन सुखी दाखवतात आणि घरात काय अवस्था आहे? आम्ही पैशाच्या घमंडीत जगतोय हे योग्य नाही, असेही हभप देशमुख महाराजांनी उपस्थितांना फटकारले.

जोपर्यंत शरीर आणि मन यांना नियंत्रित करीत नाही तोपर्यंत तुम्ही सुखी जीवन जगू शकत नाही. सोपान अण्णांनी केलेल्या कार्याचा गौरव करत त्यांच्या कार्याचा वडगावकरांनी वारसा हा पुढे चालू ठेवावा असे आवाहनही हभप देशमुख महाराजांनी यावेळी केले.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– ‘पवना कृषक’वर भाजपाची सत्ता ! सर्वपक्षीय नेत्यांच्या राजकारणाला अपयश, सिनेमाला लाजवेल अशा घडामोडी, वाचा सविस्तर
– दिव्यांग नागरिकांना हक्काचा निवारा मिळावा यासाठी राज्य शासन स्वतंत्र घरकुल योजना तयार करणार
– पवना नदी परिसरातील बेकायदेशीर बांधकामावर अतिक्रमणविरोधी कारवाईचा हातोडा ! Pavana Dam Updates


Previous Post

वडगावमध्ये ग्रामदैवत श्री पोटोबा महाराज उत्सवाला सुरुवात ; प्रसिद्ध नृत्यांगणा गौतमी पाटील हिच्या लावणीसह विविध कार्यक्रमांचे आयोजन

Next Post

ना दाखला ना कुठली सेवा मिळणार ; थकबाकीदारांवर वडगाव नगरपंचायत करणार कठोर कारवाई । Vadgaon Maval

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Vadgaon-Nagar-Panchayat

ना दाखला ना कुठली सेवा मिळणार ; थकबाकीदारांवर वडगाव नगरपंचायत करणार कठोर कारवाई । Vadgaon Maval

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Seven couples tied the knot in community wedding ceremony organized by Keshavrao Dhore Pratishthan at Vadgaon Maval

वडगाव मावळ येथे स्व. पै. केशवराव ढोरे प्रतिष्ठान आयोजित १३ व्या सामुदायिक विवाह सोहळ्यात सात जोडप्यांचे शुभमंगल सावधान

April 16, 2026
Big relief for Talegaon Dabhade residents regarding water issue Approval for reservation of water from Andhra Dam

तळेगाव दाभाडे शहरवासीयांना पाणी प्रश्नाबाबत मोठा दिलासा ! आंद्रा धरणातून ५.०१४ MCM पाणी आरक्षणास मंजुरी

April 16, 2026
Land purchase and sale transactions for proposed MIDCs at Baur, Karunj, Brahmanwadi in Maval temporarily closed

मावळमधील बौर, करूंज, ब्राम्हणवाडी येथील प्रस्तावित एमआयडीसीसाठी जमीन खरेदी-विक्रीचे व्यवहार तात्पुरते बंद

April 16, 2026
Minister Aditi Tatkare

लाडक्या बहिणींनो… ई-केवायसी च्या नावाखाली खोट्या आमिषांना बळी पडू नका – मंत्री आदिती तटकरे यांचे आवाहन

April 15, 2026
Milind Yuvak Mandal Sanghmitra Mahila Mandal pay tribute to Dr Babasaheb Ambedkar in Vadgaon Maval

मिलिंद युवक मंडळ, संघमित्रा महिला मंडळ यांच्याकडून वडगावमध्ये महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

April 15, 2026
Maval Taluka Agricultural Produce Market Committee dissolved due to lack of quorum

गणपूर्ती होत नसल्याने मावळ तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती बरखास्त ! प्रशासक म्हणून सहाय्यक निबंधक नवनाथ अनपट यांची नियुक्ती

April 15, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.