Dainik Maval News : देहूगाव ते देहूरोड दरम्यान सीओडी डेपोजवळ असलेल्या रेल्वे मार्गाच्या दुरुस्तीचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे देहूतील परंडवाल चौक ते देहूरोड या मार्गावर वाहतूक शनिवार (दिनांक 19 एप्रिल) रोजी दुपारी 1 ते 20 एप्रिलपर्यंत संध्याकाळी 7 वाजेच्या दरम्यान बंद राहणार आहे, असे रेल्वे प्रशासनाने पत्राद्वारे कळविले आहे.
ऐन वीकेंडला रस्ता बंद राहणार असल्याने नागरिकांची गैरसोय होण्याची शक्यता आहे, परंतु नागरिकांनी पर्यायी मार्गाचा अवलंब करावा, असेही आवाहन करण्यात आले आहे. हा रस्ता पूर्णपणे बंद राहणार आहे. त्यामुळे नमूद कालावधीत वाहन धारकांनी देहू ते तळवडे मार्गे निगडी, देहूरोडकडे यावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– सहारा ग्रुपवर ईडीची कारवाई ; अॅम्बी व्हॅली सिटी येथे 707 एकर जमीन जप्त, बनावट नावांनी खरेदी केली होती जमीन
– वडगाव मावळ येथे सलग बारा तास महावाचन ; शासकीय कर्मचाऱ्यांकडून महापुरुषांना अनोख्या पद्धतीने अभिवादन
– महत्वाची बातमी : शिधावाटप दुकानदारांच्या कमिशनमध्ये प्रतिक्विंटल 20 रुपये वाढ करण्याचा निर्णय
– मोठी बातमी : नगरपरिषद, नगरपंचायत, औद्योगिक नगरीच्या अध्यक्षांना हटविण्याचे अधिकार आता सदस्यानांच