Dainik Maval News : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या तळेगाव दाभाडे शाखेचा २० वा वर्धापन दिन गुरुवार, २४ एप्रिल २०२५ रोजी सायंकाळी ६:३० वाजता सेवाधाम ग्रंथालय शेजारी, नाना भालेराव कॉलनी, तळेगाव स्टेशन येथे साजरा करण्यात येणार आहे.
यानिमित्ताने ‘हास्यजत्रा’ फेम अभिनेत्री नम्रता संभेराव आणि अभिनेते-दिग्दर्शक प्रसाद खांडेकर यांना कलागौरव पुरस्कार, प्रसिद्ध सतारवादक विदुर महाजन यांना जीवन गौरव पुरस्कार, तर ‘नापासांची शाळा’ उपक्रमातून समाजपरिवर्तन घडवणारे नितीन फाकटकर यांना विशेष गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
- या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाची माहिती अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या तळेगाव दाभाडे शाखेचे अध्यक्ष सुरेश धोत्रे यांनी पत्रकार परिषदेत दिली. त्यांच्यासोबत सुरेश दाभाडे, संजय वाडेकर, विश्वास देशपांडे, संजय चव्हाण, राजेश बारणे हे पदाधिकारीही उपस्थित होते.
पुरस्कारांचे वितरण सुप्रसिद्ध अभिनेते व ‘नाम फाउंडेशन’चे संस्थापक मकरंद अनासपुरे यांच्या हस्ते, तर मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. कला गौरव पुरस्काराचे स्वरूप २५ हजार रुपये रोख व सन्मानचिन्ह असे आहे.
कार्यक्रमासाठी सुनील जाधव (प्रगतीशील शेतकरी, उद्योजक), नंदकुमार वाळुंज (सामाजिक कार्यकर्ते), भाऊसाहेब भोईर (उपाध्यक्ष, अ.भा.म. नाट्य परिषद), राजन भिसे (सिने-नाट्य अभिनेते) आणि नेहा महाजन (सिने अभिनेत्री, सतार वादक) हे विशेष निमंत्रित म्हणून उपस्थित राहणार आहेत.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– सहारा ग्रुपवर ईडीची कारवाई ; अॅम्बी व्हॅली सिटी येथे 707 एकर जमीन जप्त, बनावट नावांनी खरेदी केली होती जमीन
– वडगाव मावळ येथे सलग बारा तास महावाचन ; शासकीय कर्मचाऱ्यांकडून महापुरुषांना अनोख्या पद्धतीने अभिवादन
– महत्वाची बातमी : शिधावाटप दुकानदारांच्या कमिशनमध्ये प्रतिक्विंटल 20 रुपये वाढ करण्याचा निर्णय
– मोठी बातमी : नगरपरिषद, नगरपंचायत, औद्योगिक नगरीच्या अध्यक्षांना हटविण्याचे अधिकार आता सदस्यानांच