Dainik Maval News : महाराष्ट्र मोटार वाहन नियम, 1989 नुसार परवानाधारक ऑटोरिक्षा व टॅक्सी चालकांनी व्यवसाय करीत असतांना ‘पांढऱ्या रंगाचा शर्ट (बुश शर्ट) व खाकी रंगाची पँट’ असा गणवेश परिधान करण्यासोबतच ओळखपत्र प्रदर्शित करणे अनिवार्य आहे, असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी स्वप्नील भोसले यांनी स्पष्ट केले आहे.
प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत ऑटोरिक्षा, टॅक्सी विशेष तपासणी मोहीम राबविण्यात येणार आहे. ऑटोरिक्षा, टॅक्सी परवानाधारकांच्या वाहनाचे योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणाचे कामकाजासह मोटर तपासणीचे कामकाज करताना गणवेश परिधान करुन आपली गैरसोय टाळावी.
ऑटोरिक्षा, टॅक्सी परवानाधारक वाहनचालकांनी आपल्या वाहनाची वैध कागदपत्रे सोबत बाळगावीत. तपासणीमध्ये दोषी आढळणाऱ्या चालकांवर मोटार वाहन कायदा व प्राधिकरणाने विहित कलेल्या तरतुदीनुसार कारवाई करण्यात येईल, याची नोंद घ्यावी, असेही भोसले यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मोठी बातमी ! तळेगाव ते चाकण चार पदरी उन्नत मार्ग आणि समांतर चार पदरी रस्त्याला मंत्रिमंडळाची मंजुरी
– फसवणुकीला माफी नाही..! बनावट पनीर विक्रेत्यांवर आता एफडीएची नजर ; ग्राहकांची फसवणूक करणाऱ्यांचे परवाने रद्द होणार
– चांगला निर्णय ! अपघातग्रस्त रुग्णांसाठी एक लाख रुपयांपर्यंतचे कॅशलेस उपचार