व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, May 18, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

फसवणुकीला माफी नाही..! बनावट पनीर विक्रेत्यांवर आता एफडीएची नजर ; ग्राहकांची फसवणूक करणाऱ्यांचे परवाने रद्द होणार

अन्न व औषध प्रशासन विभाग ग्राहकांच्या हितासाठी कटिबद्ध आहे. अन्नाच्या गुणवत्तेशी कोणत्याही प्रकारची तडजोड केली जाणार नाही.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
April 20, 2025
in देश-विदेश, महाराष्ट्र
Paneer

File Image


Dainik Maval News : बनावट पनीर किंवा चीज अॅनालॉग वापरणाऱ्यांवर अन्न व औषध प्रशासन विभागामार्फत कडक कारवाई करण्यात येत आहे. पनीरसारख्या बनावट पदार्थाची विक्री केल्याचे आढळून आल्यास अशा व्यावसायिकांचे परवाने रद्द करण्यात येतील, असा इशारा अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी दिला आहे.

मंत्री झिरवाळ यांनी सांगितले, पनीर हा खाद्यपदार्थामधील आवडता पदार्थ असून त्याला बाजारात मोठी मागणी असते. विशेषतः लहान मुलांमध्ये पनीरची क्रेझ अधिक आहे. मात्र काही ठिकाणी बनावट पनीर अथवा ‘चीज अॅनालॉग’ वापरून ग्राहकांची फसवणूक केली जात असल्याचे अन्न व औषध प्रशासन विभागाच्या तपासणीत आढळून येते. अशा प्रकारे ग्राहकांची दिशाभूल करणाऱ्या पनीर विक्रेत्यांवर अन्न सुरक्षा व मानके अधिनियम 2006, तसेच 2011 आणि 2022 मधील नियमानुसार ही कारवाई केली जाईल.

  • अन्न सुरक्षा आणि मानके (लेबलिंग व डिस्प्ले नियमन) 2020 च्या नियमांनुसार, विक्री होणाऱ्या अन्नपदार्थातील सर्व घटक व पोषणमूल्यांची माहिती ग्राहकांसमोर मांडणे बंधनकारक आहे. रेस्टॉरंट, हॉटेल, कॅटरर्स आणि फास्ट फूड विक्रेत्यांना आपल्या मेनू कार्ड्स, डिस्प्ले बोर्ड्स आणि ऑर्डर मशीनवर अचूक माहिती देणे अनिवार्य आहे.

अन्न व औषध प्रशासन विभाग ग्राहकांच्या हितासाठी कटिबद्ध आहे. अन्नाच्या गुणवत्तेशी कोणत्याही प्रकारची तडजोड केली जाणार नाही.

रेस्टॉरंट, हॉटेल व फास्ट फूड व्यावसायिकांकडून ग्राहकांची फसवणूक होत असल्याचे निदर्शनास आल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

  • अन्न सुरक्षा व मानके अधिनियम २००६ च्या कलम १८ (२)(e) नुसार, ग्राहकांना अन्नपदार्थातील घटकांची माहिती देणे बंधनकारक आहे. तसेच, अन्न सुरक्षा व मानके (लेबलिंग आणि डिस्प्ले) नियमन २०२० च्या प्रकरण ३ मधील नियमन ९ (६) नुसार, अन्न व्यावसायिकांनी अन्नपदार्थांची विक्री करताना पोषण संबंधित माहिती आणि त्यातील घटकांची माहिती, तसेच आरोग्य संदेश प्रदर्शित करणे आवश्यक आहे.

अन्न व औषध प्रशासन सर्व अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांना त्यांच्या कार्यक्षेत्रातील चीज अॅनालॉग वितरकांचे खरेदी-विक्री बिले तपासण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच, हॉटेल, रेस्टॉरंट, फास्ट फूड विक्रेते आणि केटरर्स यांची खरेदी बिले तपासून, पनीरच्या ऐवजी अॅनालॉगचा वापर करून ग्राहकांची फसवणूक केल्यास, किमान १० आस्थापनांची सखोल तपासणी करून अन्न नमुने घेऊन घाडी-जप्तीची कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांवर अन्न सुरक्षा व मानके अधिनियम २००६, नियम व नियमन २०११ तसेच अन्न सुरक्षा व मानके (अन्न व्यवसायिक परवाना व नोंदणी) नियमन २०११ मधील तरतुदींनुसार तात्काळ परवाना निलंबनाची कार्यवाही केली जाईल.

  • विभागीय सह आयुक्त (अन्न) आणि सहा आयुक्त (अन्न) यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील हॉटेल असोसिएशनच्या कार्यशाळा घेऊन, पनीरच्या ऐवजी चीज अॅनालॉगचा वापर करत असल्यास, त्याबाबत मेनू कार्डमध्ये उल्लेख करण्याबाबत तसेच कायद्यातील तरतुदींबाबत अवगत करावे. यासोबतच, ग्राहकांमध्ये याबाबत जनजागृती करावी.

ग्राहकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या फसवणुकीला माफ केले जाणार नसून अन्न व्यावसायिकांनी नियमांचे पालन करून ग्राहकांना अचूक माहिती देणे आवश्यक आहे.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– आमदार शेळके, सहकारमहर्षी दाभाडे यांच्या उपस्थितीत जिल्हा परिषद माळवाडी शाळेच्या नवीन वर्गखोल्यांचे उद्घाटन
– मावळातील सर्व शासकीय व धर्मादाय रुग्णालयांमध्ये शासनाच्या योजनांची माहिती देणारे फलक लावावेत ; तहसीलदारांना निवेदन
– लोणावळ्यातील श्रोत्यांसाठी व्याख्यानांची पर्वणी ; 21 एप्रिलपासून शहरात वसंत व्याख्यानमालेचे आयोजन । Lonavala News


Previous Post

पोस्टर फाडल्याच्या रागातून जमावाकडून एकाला बेदम मारहाण, धामणे गावातील प्रकार । Maval Crime

Next Post

बेकायदेशीररित्या सुरू असलेल्या बालगृह, वसतिगृह आणि अनाथाश्रमांविरोधात कारवाई केली जाणार

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Action will be taken against illegally running children homes hostels and orphanages

बेकायदेशीररित्या सुरू असलेल्या बालगृह, वसतिगृह आणि अनाथाश्रमांविरोधात कारवाई केली जाणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला मोठे यश; संत तुकाराम महाराज जन्मस्थान विकासासाठी ४१ कोटींच्या आराखड्यास शासनाची मान्यता

आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला मोठे यश; संत तुकाराम महाराज जन्मस्थान विकासासाठी ४१ कोटींच्या आराखड्यास शासनाची मान्यता

May 18, 2026
Sant Tukaram Sugar Factory starts using Artificial Intelligence AI and Drone Technology for 2025-26 season

संत तुकाराम साखर कारखान्याकडून २०२५-२६ हंगामासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर सुरू

May 18, 2026
Spontaneous response of Vadgaonkar citizens to Chhatrapati Shivaji Maharaj Maharajswa Samadhan Camp

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरास वडगावकर नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, विविध दाखल्यांचे वाटप

May 18, 2026
young Girl and Boy studying in Pune drowned in Shirota Dam near Lonavala Maval

पुणे येथे शिक्षण घेणाऱ्या तरूण तरूणीचा लोणावळा जवळील शिरोता धरणामध्ये बुडून मृत्यू

May 18, 2026
House listing and census process begins in Pune district

पुणे जिल्ह्यात घरसुचीकरण व गृहगणनेच्या प्रक्रियेला सुरुवात

May 17, 2026
Chhatrapati Shivaji Maharaj Maharajasva Camp held at Talegaon Dabhade Municipal Council

तळेगाव दाभाडे नगरपरिषदेत ” छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर ” संपन्न

May 17, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.