Dainik Maval News : मावळसह पिंपरी-चिंचवड शहरासाठी वरदान असणाऱ्या पवना धरणाची राज्याचे जलसंपदामंत्री डॉ. राधाकृष्ण विखे-पाटील यांनी शनिवारी (दि.२६) पाहणी केली. तसेच पवनाधरण शाखेच्या कार्यालयात भेट देऊन धरणाच्या अतिक्रमण, पाण्याचे नियोजन, पाणी प्रदूषण नियंत्रण, धरण सुरक्षा, शासकीय जमीनीचे रक्षण, तसेच धरण क्षेत्रालगत पर्यटनवाढीच्या दृष्टीने व स्थानिकांच्या रोजगार निर्मितीसाठी राबविण्यात येणाऱ्या प्रकल्पाच्या आराखड्यांबाबत माहिती घेत अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.
यावेळी मावळचे आमदार सुनील शेळके, दौंडचे आमदार राहुल कुल यांची प्रमुख उपस्थिती होती. तर जलसंपदा विभागाचे कार्यकारी संचालक अतुल कपोले, मुख्य अभियंता हनुमंत गुणाले, मुख्य अभियंता हेमंत धुमाळ, कार्यकारी अभियंता श्वेता कुऱ्हाडे, सहाय्यक अभियंता सचिन गाडे, मावळ मुळशी उपविभागीय अधिकारी सुरेंद्र नवले, तहसीलदार विक्रम देशमुख यांच्या सह पदाधिकारी व अधिकारी,कर्मचारी उपस्थित होते.
अवैध बांधकामांबाबत अधिकाऱ्यांची कानउघाडणी –
पवनाधरण परिसरात मोठ्या प्रमाणावर धरणाच्या जागेवर धनदांडग्यांनी अतिक्रमणे करुन विविध बंगले, फार्महाऊस बांधले असून याबाबत अधिकाऱ्यांना विचारले असता धरणाच्या जागेवर अवैधकामे कशी झाली, येत्या पंधरा दिवसांत अतिक्रमणे काढण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहे.
धरणाच्या पाण्याचे नियोजन काटेकोरपणे करा –
मावळसह पिंपरी-चिंचवड भागाला पाणी पुरवठा करणाऱ्या पवना धरणाच्या पाण्याचे नियोजन करुन भविष्यात पाणी कमी पडणार नाही, याबाबत सूचना अधिकारी वर्गाला देण्यात आल्या आहेत.
पवना धरणाच्या सुरक्षेबाबत यंत्रणेला सूचना –
पवनाधरणाच्या पाण्यावर संपूर्ण पिंपरी-चिंचवड सह मावळातील मोठा भाग अवलंबून असल्याने धरणाच्या सुरेक्षेकडे काटेकोरपणे लक्ष घालून धरणाच्या मजबुतीकरणाचा प्रश्न लवकरच मार्गी लावणार आहे. सुरक्षेच्या दृष्टीने धरण परिसरात मोठ्या प्रमाणावर पर्यटक येत असतात, यामध्ये पाण्यात जातांना योग्य ती काळजी घेण्याबाबत सुचना देण्यात यावा. पर्यटन क्षेत्र वाढीवर भर देणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– पहलगाम येथील भ्याड दहशतवादी हल्ल्याचा लोणावळा शहरात सर्वपक्षीयांकडून तीव्र निषेध । Lonavala News
– पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ वडगाव मावळ येथील सर्वपक्षीय मशाल रॅली । Vadgaon Maval
– कामशेतमध्ये सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांकडून पहलगाम येथील क्रूर हल्ल्याचा जाहीर निषेध । Kamshet News
