Dainik Maval News : आमच्या कंपनीत गुंतवणूक केल्यास जादा परतावा मिळेल, असे अमिष दाखवून एका नागरिकाची १८ लाख १२ हजार रुपयांची फसवणूक केली. ही घटना मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे येथे घडली. राकेश नारायणसिंग चौधरी (वय ४५, रा. तपोधाम कॉलनी, तळेगाव दाभाडे) यांनी शनिवारी (दि. २६) याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी एका अज्ञात महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. ही घटना ४ डिसेंबर २०२४ ते १ जानेवारी २०२५ या कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे घरी असताना त्यांना ९६०१५८९८२९ या मोबाइल क्रमांकावरून प्रीती वर्मा नावाच्या महिलेने फोन केला. आपण आर्या फायनान्स अलायन्स कंपनीतून बोलत असल्याचे सांगितले. तुम्ही आमच्या कंपनीत गुंतवणूक केल्यास तुम्हाला २० टक्के नफा होईल, असे अमिष दाखविले.
त्यानंतर फिर्यादी यांना व्हाट्सअप ग्रुपमध्ये सहभागी केले. त्या ग्रुपमधील लोक मेसेज टाकत असल्याने फिर्यादी यांनी तिच्या बोलण्यावर विश्वास ठेवून वेगवेगळ्या बँक खात्यावर १८ लाख १२ हजार रुपये पाठविले. फिर्यादी यांना ७० ते ८० लाख रुपये नफा झाल्याचे दिसत होते. ते पैसे काढण्याचा प्रयत्न केला असता फिर्यादी यांना ते पैसे काढता आले नाहीत. तसेच सदर महिलेने फिर्यादी यांना व्हाट्सअप ग्रुप मधून काढून टाकत फसवणूक केली.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मावळमधील पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये दहशतवादी कैद? लेकीच्या रिल्समध्ये दोन दहशतवादी कैद झाल्याचा वडिलांचा दावा
– मंथन सामान्य ज्ञान परीक्षा : साते गावातील दोन विद्यार्थी केंद्रस्तरीय यादीत चमकले । Maval News
– पुणे जिल्हा नियोजन समिती बैठक : सर्व तालुक्यांना एकसारखा निधी दिला जाईल । Pune DPDC